Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात एका ठराविक वेळेनंतर 9 ग्रह आपली स्थिती बदलतात. येत्या 14 जानेवारीला ग्रहांचा राजा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करणार आहे. यादिवशी देशभरात मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2025) सण साजरा करण्यात येतो. मकर संक्रांतीनंतर ग्रहांचा सेनापती मंगळ आपली स्थिती बदलणार आहे. वैदक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा शौर्य, धैर्य, सामर्थ्य आणि उर्जेचा कारक मानला जातो. 21 जानेवारी 2025 ला मंगळ मिथुन राशीत करणार असून प्रतिगामी वाटचाल करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह मागे सरकतो तेव्हा त्याचे नकारात्मक परिणाम होतो. अशा स्थितीत मंगळाची प्रतिगामी हालचाल काही राशींसाठी अशुभ ठरणार असून कोणत्या आहेत त्या राशी पाहूयात. 


मिथुन (Gemini Zodiac)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अशुभ ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ या राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात या राशीच्या लोकांनी काळजी घ्या. मंगळाच्या राशीत बदलामुळे तुमचे वैयक्तिक जीवन देखील खूप विस्कळीत होण्याचे भाकीत करण्यात आलंय. जोडीदारासोबत तणाव वाढणार आहे. आरोग्याची काळजी नक्की घ्या. नोकरदार लोकांना काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. कुटुंबातील सदस्यांशी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. 


 


हेसुद्धा वाचा - Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीला 'या' रंगाचे कपडे घालू नयेत, तर 6 गोष्टींचा वापर चुकून करु नका अन्यथा...


 


कर्क (Cancer Zodiac)   


या राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण अशुभ ठरणार आहे. मंगळ या राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनावर खूप प्रभाव पडणार आहे. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. या काळात जास्त खर्च करणे टाळावे लागणार आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. वादापासून दूर चारहात दूर राहा. व्यवसायात नुकसान सहन करावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी बॉसशी भांडण होण्याची शक्यता आहे. रिलेशनशिपमध्ये असलेल्या लोकांनाही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. 


वृश्चिक (Scorpio Zodiac)   


मंगळाचे हे संक्रमण वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात अनेक समस्या घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही तुमचे ध्येय साध्य करू शकणार नाही. तुमचा एखादा मित्र तुमचा विश्वासघात करण्याती शक्यता आहे. या काळात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या. तुम्हाला प्रत्येक कामात अडथळे आणि अडचणींचा सामना करावा लागणार आहे. वैवाहिक जीवनाबद्दल बोलले तर त्यांच्या आयुष्यात तणाव वाढणार आहे. या काळात तुमचे चालू असलेले कामही बिघण्याची शक्यता आहे. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)