Mangal Ast Effect 2023: ग्रहांचा भ्रमण कालावधी यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. ज्योतिष्यांचं बारीक लक्ष या घडामोडींवर लागून असतं. ग्रह गोचरानंतर ग्रहाचा अस्त-उदय किंवा वक्री होणं महत्त्वाचं असतं. यामुळे काही राशींवर शुभ, तर काही राशींवर अशुभ परिणाम होतो. 2023 हे वर्ष सुरु झालं असून आता या वर्षातील पहिला महिना संपणार आहे. जानेवारीत बऱ्याच मोठ्या ग्रहांची उलथापालथ पाहायला मिळाली. 13 जानेवारी 2023 रोजी मंगळ शुक्राच्या वृषभ राशीत मार्गस्थ झाला आहे. मंगळ 13 मार्चला मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत मंगळ जवफास 45 दिवसांपर्यंत ठाण मांडणार आहे. मात्र मंगळ या वर्षात अस्ताला जाणार असल्याने काही राशींची धाकधूक वाढली आहे. 


मंगळ ग्रह गोचर


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    13 मार्च 2023 रोजी मिथुन राशीत प्रवेश

  • 10 मे 2023 रोजी कर्क राशीत प्रवेश

  • 1 जुलै रोजी सिंह राशीत प्रवेश

  • 18 ऑगस्ट रोजी कन्या राशीत प्रवेश

  • 3 ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश

  • 16 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश

  • 28 डिसेंबर रोजी धनु राशीत प्रवेश 


मंगळ ग्रह अस्त तारीख आणि वेळ


14 सप्टेंबर 2023 रोजी गुरुवारी सकाळी 7 वाजून 25 मिनिटींनी मंगळ ग्रह अस्तला जाणार आहे. मंगळ ग्रह या स्थितीत 21 जानेवरी 2024 पर्यंत असणार आहे. जवळपास 129 दिवस मंगळ ग्रह अस्ताला जाणार आहे.


बातमी वाचा- Gajlakshmi Yoga 2023: गुरुनं मेष राशीत हजेरी लावताच जुळून येणार गजलक्ष्मी योग, या राशींना मिळणार फळ


या तीन राशींनी घ्यावी काळजी


  • मेष- राशीचक्रातील पहिली रास असलेल्या मेषेचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे मंगळ ग्रह अस्ताला जाताच जातकांच्या अडचणीत वाढ होईल. आपली बाजू दुसऱ्या समोर ठेवताना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे कोणताही मोठा निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या. तसेच मंगळ ग्रह अस्ताला असताना मारुतिरायची पूजा करा.

  • धनु- या राशीच्या जातकांची नुकतीच शनिच्या साडेसातीतून सुटका झाली आहे. त्यानंतर आता मंगळ ग्रह अस्ताला जाणार असल्याने काळजी घेणं आवश्यक आहे. कारण या काळात आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच जीवनात अनेक अडचणींना सामना करावा लागू शकतो. मंगळाच्या अशुभ परिणाम कमी करण्यासाठी नियमीत हनुमान चालीसेचं पठण करावं.

  • वृश्चिक- मेष राशीप्रमाणे मंगळ हा वृश्चिक राशीचा स्वामीही आहे. त्यामुळे 129 दिवस जरा सांभाळून पावलं उचलणं हुशारीचं ठरेल. वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. तसेच कामाच्या ठिकाणी जरा जपूनच पावलं उचलेली बरं ठरेल. दर मंगळवारी हनुमान चालिसेच्या पठणामुळे दिलासा मिळेल. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)