Gajlakshmi Yoga In Mesh: राशीचक्रात ग्रहांचं भ्रमण आपल्या परिवर्तन कालावधीनुसार होत असतं. प्रत्येक राशींचा भ्रमण कालावधी ठरलेला आहे. या दरम्यान काही ग्रह अस्ताला, तर काही ग्रह वक्री होतात. यामुळे काही राशींवर शुभ अशुभ परिणाम होत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रह 21 एप्रिल 2023 रोजी रात्री 8 वाजून 43 मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत या आधीच राहुची उपस्थिती आहे. त्यामुळे गोचर होताच गजलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या योगामुळे जातकांना सुख-शांतीसोबत आणि
आर्थिक अडचण दूर होते. या योगाचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
मेष- गजलक्ष्मी योग या राशीतच तयार होत आहे. गुरु ग्रहाने या राशीत प्रवेश करताच हा योग सुरु होणार आहे. यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होणार आहे. नोकरी, करिअर आणि व्यापाऱ्यात सकारात्मक बदल दिसून येईल. आर्थिक अडचणही या काळात दूर होईल. पत्नी पतीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. तसेच काही शुभ बातमी मिळण्याचे संकेत आहेत. बऱ्याच काळ्यापासून अडकलेली काम या काळात मार्गस्थ होतील. आरोग्याशी निगडीत समस्याही या काळात दूर होतील. ग्रह अनुकूल असले तरी चांगली कर्म करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
मिथुन- या राशीच्या लोकांची नुकतीच शनिच्या अडीचकीतून सुटका झाली आहे. त्यात गुरुच्या गोचरानंतर गजलक्ष्मी योगाचा फायदा होणार आहे. गजलक्ष्मी योगामुळे नशिबाची चांगली साथ मिळेल. या काळात उत्पन्नात वाढ होईल. तसेच गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनही सुखमय होईल. या काळात लग्न जुळण्याचा विशेष योग आहे.
बातमी वाचा- साडेसातीचा फेरा आणि शनिदेवांचा वचक असताना कसा मिळवाल दिलासा, जाणून घ्या ज्योतिषशास्त्रीय उपाय
धनु- ज्योतिषशास्त्रानुसार धनु राशीच्या लोकांची शनिच्या साडेसातीतून सुटका झाली आहे. असं असताना गुरु गोचरामुळे दुहेरी फायदा मिळणार आहे. गजलक्ष्मी योगामुळे अनेक फायदे होतील. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच लव्ह लाईफ चांगली असेल. गुरु गोचरामुळे लांबच्या प्रवासाचा योग जुळून येणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)