Neechbhang Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ज्यावेळी एखादा ग्रह गोचर करतो तेव्हा इतर ग्रहांसोबत युती किंवा काही शुभ-अशुभ योग तयार होतात. प्रत्येक ग्रह एका ठराविक कालावधीनंतर आपली राशी बदलतो. मंगळ गर्हाने कर्क राशीत प्रवेश केल्याने नीचभंग राजयोग तयार झाला. या राजयोगाचा प्रभाव अनेक राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैदिक शास्त्रमध्ये हा राजयोग खूप प्रभावी मानला जातो. ज्यावेळी जेव्हा कुंडलीत 6व्या, 8व्या आणि 12व्या घरांचे स्वामी एकाच घरात असतात तेव्हा हा राजयोग तयार होतो. दरम्यान नीचभंग राजयोगाने काही राशींच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेऊया.


मेष रास


ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीत मंगळ असल्यामुळे राजयोग तयार होतोय. मेष राशीच्या लोकांना प्रचंड फायदा होईल. मंगळ तुमच्या राशीच्या चौथ्या घरात भ्रमण करतोय. वैवाहिक जीवनात आनंद येणार असून काही आर्थिक समस्या असतील तर त्या सुटणार आहेत. त्यामुळे या काळात व्यक्तीच्या सुखसोयी वाढतात. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होणार आहे. तसंच तुम्ही अधिकाधिक पैसे कमवू शकाल. प्रेम संबंध पुन्हा जुळून येणार आहेत. 


मीन रास


ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांसाठी नीच भांग राजयोग देखील अनुकूल परिणाम देणार आहे. या राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. हा राजयोग या राशींच्या स्त्रियांसाठी खास फायदेशीर असणार आहे.  वैवाहिक जीवनात आनंद येणार आहे. चांगली कामगिरी करू शकाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. इच्छा असल्यास तुम्ही परदेशी यात्रा देखील करू शकता.


वृश्चिक रास


मंगळाच्या कर्क राशीत भ्रमणामुळे नीचभंग राजयोग वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ राहणार आहे. या काळात या राशींच्या व्यक्तीला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुम्हाला मनाजोगी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कोणत्या ठिकाणी थांबलेले पैसे मिळतील. परदेश प्रवास, सरकारी नोकरी इत्यादींमध्ये भाग्य तुम्हाला साथ देईल. परदेशात नोकरी मिळू शकते. तसंच या राशींच्या व्यक्तींना अप्रत्यक्षपणे फायदा मिळणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )