Pitru Paksha 2023 Date and Time : वर्षभरातील 15 दिवस हे पूर्वज किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिले जातात. त्या पंधरवड्याला पितृ पक्ष असं म्हटलं जातं. शास्त्रात असं म्हणतात या  15 दिवसात यमराज आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करतो. मुक्त झालेले हे पूर्वज या काळात आपल्या कुटुंबियांकडून तर्पण, पिंड दान स्विकारतात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 29 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात होईल आणि 14 ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष असणार आहे. (pitru paksha 2023 daughter can do pind daan shradh puja rules vidhi mantra in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पितृ पक्ष काळात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृ दोष मुक्ती मिळवण्यासाठी पिंड दान आणि तर्पण केलं जातं. घरातील मुलगा हा विधी करत असतो. मात्र आज छोटी कुटुंब पद्धती असून अनेक घरांमध्ये मुलगी असते. अशावेळी पिंड दान मुलगी करु शकते का? काय आहे नियम, त्याशिवाय पिंड दानाचे नियम जाणून घ्या. 


 पिंड दान म्हणजे काय?(What is Pind Daan)


शास्त्रानुसार पिंड म्हणजे कुठल्या तरी वस्तूचा गोलाकार रुप. शास्त्रात पिंडाला प्रतिकात्मक शरीर मानलं जातं. पिंड हे तांदूळ आणि जवाचे पीठ, काळे तीळ आणि तूप घालून गोलकार गोळे बनवले जातात. याला विधीला पिंड दान असं म्हटलं जातं. 


पितृ पक्षातील पिंड दानाचे महत्त्व  (Pitru Paksha Pind daan importance)


पितृपक्षात मृत नातेवाईकांचं पिंडदान करणे महत्त्वाचे मानले जाते. पिंडदान केल्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. शास्त्रानुसार भूतांपासून संरक्षण मिळवण्यासाठी पितरांना तर्पण विधी केला जातो. असं म्हणतात की, पिंड दान केलं नाही तर पितरांची आत्मा दुःखी आणि असंतुष्ट राहते. त्याशिवाय यामुळे घरावर पितृ दोष निर्माण होतो. 


मुली पिंड दान करू शकतात का? (daughter can do Pind Daan ?)


ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, वडील किंवा वंशजांच्याआत्म्याच्या समाधानासाठी घरातील ज्येष्ठ पुत्र हा श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करण्याची प्रथा आहे. वडिलोपार्जित ऋणातून मुक्त होण्यासाठी पुत्राकडून पिंड दान महत्त्वाचे असते. मात्र जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर अशा कुटुंबातील मुलगी, पत्नी आणि सून त्यांचे श्राद्ध आणि पिंड दान करु शकतात. 


पिंड दान पद्धत (Pind Daan Vidhi)


यंदा पितृ पक्षात पिंड दानसाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत आहे. पिंडदान विधी हा पवित्र नदी काठी करण्यात येतो. धार्मिक स्थळांवर पिंडदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिंड बनवण्यासाठी शिजवलेला भात, दूध, साखर, मध आणि तूप मिक्स करा. आता दक्षिण दिशेला तोंड करून पिंडावर फुलं, चंदन, मिठाई, फळं, अगरबत्ती, तीळ, जव आणि दही अर्पण करुन पूजा करा. पिंडदान केल्यानंतर पितरांची पूजा करा. आता हे पिंड वाहत्या पाण्यात समर्पित करा. त्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्या. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जेवण करावे. 


पिंड दान मध्ये किती पिंड बनवतात?


धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात तीन पिढ्यांपर्यंत श्राद्ध केलं जातं. पिंड दानमध्ये प्रामुख्याने पहिले तीन पिंड बनवले जातात. वडील, आजोबा आणि पणजोबा.. वडील हयात असतील तर आजोबा आणि पणजोबा यांच्या नावाने पिंड तयार केले जाता. 


हेसुद्धा वाचा - Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी दुर्मिळ योग! 5 राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)