Blue Supermoon Update: 30 ऑगस्ट रोजी आकाशात अद्भूत आणि विलोभनीय दृश्य दिसणार आहे. या वर्षातील सर्वात मोठा आणि तेजस्वी चंद्र या 30 ऑगस्ट रोजी पाहायला मिळणार आहे. राखीपौर्णिमेच्या दिवशीत आकाशात ब्लू सुपरमून दिसणार आहे. चंद्रावर एकत्र तीन दुर्मिळ घटना घडत असतानाच या चंद्राला ब्लू सुपरमून असं म्हटलं जातं. भारताचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर असताना हा अद्भूत नजारा पाहायला मिळणार आहे. 


ब्लुमून आणि निळा रंग यांचा संबंध काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर ब्लुमून या शब्दाचा निळ्या रंगाशी कोणताही संबंध आढळत नाही. या उलट या दिवशी चंद्र नारंगी रंगाचा दिसतो. ब्लू मून ही संकल्पना एखाद्या दुर्मिळ घटनेसाठी वापरली जाते. विसाव्या शतकाच्या मध्यापासून एका महिन्यात दोन पौर्णिमा आल्यास त्यांपैकी दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला 'ब्ल्यू मून' म्हणून संबोधले जाऊ लागले. वेगवेगळ्या ठिकाणांवरील वातावरणानुसार, चंद्राच्या रंगांमध्ये बदल होतात. जसं कुठे पांढरा शुभ्र, तर कुठे हलक्या लाल रंगाचा किंवा नारंगी, पिवळ्या रंगाचा चंद्र दिसून येतो. 


तीन वर्षानंतर पुन्हा अनुभवता येणार


30 ऑगस्ट रोजी चंद्र पृथ्वीपासून नेहमीपेक्षा अधिक जवळ असतो. या खगोलीय घटनेला ब्लू सुपरमून म्हटलं जाते. यादरम्यान वातावरण जास्त साफ असेल तर चंद्र अधीक चमकदार आणि मोठा दिसू शकतो. ब्लू मून साधारणतः दोन किंवा तीन वर्षांनंतर एकदा दिसून येतो. 30 ऑगस्टनंतर आता थेट 31 मे 2026 रोजी ब्लू मून पाहायला मिळणार आहे. 


ब्लू मूनच्या दरम्यान चंद्र पृथ्वीच्या कक्षेच्या खूप जवळ असणार आहे. यावेळी पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर 357,344 किमी दूर असणार आहे. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, साध्या डोळ्यांनीही आकाशातील हे दृष्य तुम्ही पाहू शकणार आहे. सुपरमूनच्या काळात चंद्र 14 टक्के मोठा आणि 30 टक्के जास्त तेजस्वी दिसणार आहे. भारताचे चांद्रयान यावेळी चंद्राच्या पृष्ठभागावर असताना भारतीयांसाठी हा खास क्षण असणार आहे. 


राखी पौर्णिमा आणि ब्लू मून या योग जुळून आला आहे. खगोलशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो तेव्हा समुद्राला भरती येणे अशा घटनाही घडू शकतात.