Horoscope 25 July 2023 : आजचा दिवस कोणत्या राशींना फळणार, कोणाला सावध करणार? पाहा राशीभविष्य
Horoscope 25 July 2023 : प्रत्येक राशीच्या अनुशंगानं दैनंदिन राशीभविष्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी मांडलेल्या असतात. अनेकदा त्या आपल्याला सावध करतात किंवा मग येणाऱ्या आनंदाची चाहूलही देतात.
Horoscope 25 July 2023 : राशीभविष्य... अनेकांचा दिवसच मुळात सुरु होतो तो म्हणजे या राशीभविष्याच्या वाचनानं. आपल्या राशीत नेमकं काय वाढून ठेवलंय याचा पुसटसा अंदाजही अनेकांना पुरेसा असतो. चला तर मग, पाहुया आजचं राशीभविष्य
मेष (Aries)- आज स्वत:च्या आणि जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबात शुभवार्ता कलणार आहे. एखाद्या काळ्या वस्तुचं दान कराल.
वृषभ (Taurus) - प्रेमाच्या नात्यात आज वाद टाळा. शत्रूला नुकसान पोहोचवण्याचा हेतूही दूरच ठेवा. आज सर्वांना समान वागणूक द्या.
मिथुन (Gemini)- आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. एखादा नवा अनुभव तुम्हाला बरंच काही शिकवून जाणार आहे. मानसिक जाण घेऊ नका.
कर्क (Cancer)- आरोग्याची काळजी घ्या. गृहक्लेश तुम्हाला संकटात आणू शकतात. पण, काही विश्वासाची माणसं इथं तुम्हाला मदत करणार आहेत.
सिंह (Leo)- आज तुमची मेहनत फळणार आहे. ज्या क्षेत्रांमध्ये तुम्ही योगदान दिलं आहे त्या क्षेत्रांमधून आनंदवार्ता कळणार आहे. प्रगतीपथावर तुमचा प्रवास सुरु होणार आहे.
कन्या (Virgo)- आरोग्य चांगलं असेल. एखाद्या कौटुंबीक कार्यक्रमात हजेरी लावण्याची संधी मिळेल. व्यापारात प्रगती करण्याची संधी आहे.
तूळ (Libra)- मन अस्थिर असेल. पण, एकाग्रतेनं त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विचार करा. देवतांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
हेसुद्धा वाचा : Panchang Today : आज श्रावण अधिक मासातील सिद्धी योग! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
वृश्चिक (Scorpio)- आज अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. एखाद्या कामात येणारी अडचण अखेर आज दूर होणार आहे. मोठ्यांचे आशीर्वाद लाभणार आहेत.
धनु (Sagittarius)- मन अस्थि असलं तरीही जोडीदाराच्या मदतीनं मनावरही ताबा मिळणार आहे. न्यायालयीन कामातून सुटका होणार आहे.
मकर (Capricorn)- नव्या व्यापाराची सुरुवात करण्यासाठी आज तुम्ही पहिलं पाऊल टाकणार आहात. न्यायालयीन कामं मार्गी लागणार आहेत.
कुंभ (Aquarius)- आज स्वाभिमान दुखावेल. आरोग्य उत्तम असेल. प्रेमाच्या व्यक्तींची साथ लाभेल. प्रवासयोग आहे.
मीन (Pisces)- आज कुटुंबात आनंदाची बातमी कळणार आहे. अविवाहितांसाठी मनागोजं स्थळ येणं अपेक्षित आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा आहे.
( Disclaimer - वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांशी संलग्न असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही. )