Rashi Parivartan: शुक्र, बुध आणि सूर्य वृश्चिक राशीत करणार प्रवेश, या राशींना मिळणार लाभ
दर महिन्याला ठरावीक ग्रहांचा गोचर होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित यावरून ज्योतिष अंदाज बांधत असतात. आता नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन ग्रह वृश्चिक राशीत (Vruschik Rashi) प्रवेश करणार आहेत.
Grah Gochar In Vrushchik Rashi: दर महिन्याला ठरावीक ग्रहांचा गोचर होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत स्थित यावरून ज्योतिष अंदाज बांधत असतात. आता नोव्हेंबर महिन्यात एकापाठोपाठ एक असे तीन ग्रह वृश्चिक राशीत (Vruschik Rashi) प्रवेश करणार आहेत. शुक्र (Shukra), बुध (Budh) आणि सूर्य (Surya) वृश्चिक राशीत संक्रमण आहे. या गोचर भ्रमणाचा सर्वच राशींवर प्रभाव पडणार आहे. शुक्र ग्रह 11 नोव्हेंबरला, बुध ग्रह 13 नोव्हेंबरला आणि ग्रहांचा राजा सूर्य 16 नोव्हेंबरला वृश्चित राशीत असणार आहे. तीन ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार असल्याने चार राशींना विशेष लाभ होणार आहे.
वृश्चिक: या राशीच्या लोकांना ग्रह गोचराचा विशेष फायदा होणार आहे. तीन ग्रह या राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या राशीची अडकलेली कामं मार्गी लागतील. गुंतवणुकीचे नवे मार्ग खुले होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळेल. समाज आणि कुटुंबात मान-सन्मान वाढेल. जोडीदारासोबत संबंध आणखी दृढ होतील.
कर्क: या राशीवर या महिन्यात ग्रहांची विशेष कृपा असणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रमोशन आणि आर्थिक लाभ मिळेल. शिक्षण क्षेत्रात कमा करणाऱ्या लोकांसाठी गोचर कालावधील लाभदायी असेल. नोकरदार वर्गाला करिअरमध्ये नवनव्या संधी मिळतील. कुटुंबातील वाद कमी होतील.
मीन: या राशीच्या लोकांना ग्रहांच्या गोचरामुळे लाभ मिळेल. कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारासाठी हा काळ शुभ राहील. स्थावर मालमत्तेचा व्यवहार मार्गी लागतील. तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन स्रोत मिळतील. सूर्य गोचरामुळे करिअरमध्ये नवी संधी मिळेल. समाजात मानसन्मान वाढेल.
Shani Margi: शनिदेवांची 17 जानेवारीपर्यंत 'या' राशींवर असेल कृपा, आर्थिक अडचणी होतील दूर
मिथुन: या राशीच्या लोकांना कुटुंबात अचानक चांगली बातमी मिळू शकते. तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल आणि तुम्हाला पैसे मिळतील.या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात नवे करार निश्चित होतील. कुटुंबासोबत बाहेर फिरण्याचा योग आहे. त्याचबरोबर अडकलेले पैसे परत मिळू शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)