Shani Margi 2022: राशीचक्रात शनिदेवांचा भ्रमण कालावधी सर्वात धीम्या गतीने होतो. शनिदेव (Shanidev) ज्या राशीत असतात, त्या राशीच्या मागच्या आणि पुढच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव असतो. शनिदेव एका राशीत अडीच वर्षे राहतात. शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे शनिदेव राशीत आले की भल्याभल्यांना घाम फुटतो. शनिदेवांचं गोचर, वक्री आणि मार्गस्थ होणं ज्योतिषशास्त्रात (Astrology) खूप महत्त्वपूर्ण असतं. शनिदेवांच्या या स्थितीमुळे मानवी जीवनावर परिणाम होतो, अशी समज आहे. शनिदेव 23 ऑक्टोबरला मकर (Makar) राशीत मार्गस्थ झाले आहेत. अशा स्थितीत 17 जानेवारीपर्यंत असणार आहेत. त्यात शनिदेव धनिष्ठा नक्षत्रात (Dhanishtha Nakshatra) असून मंगळ स्वामी आहेत. शनि आणि मंगळ यांना एकमेकांचं शत्रू मानलं जातं. पण असं असलं तरी यामुळे एक शुभ योग तयार होणार आहे. हा योग काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
मकर- या राशीच्या लोकांवर शनिची साडेसाती सुरु आहे. पण शनिदेव 23 ऑक्टोबरपासून मार्गस्थ झाल्याने या राशीच्या लोकांना लाभ मिळणार आहे. या काळात अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत. धनलाभ होणार आहे. या काळात शनिदेवांची आराधना केल्यास शुभ परिणाम दिसून येतील. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
कुंभ- या राशीवर सुद्धा शनि साडेसातीचा प्रभाव आहे. मार्गस्थ झालेला शनिदेव 17 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पण तत्पूर्वी या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. नोकरी आणि व्यापार करणाऱ्या लोकांना चांगलं फळ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
Lal Kitab: चांदीच्या एका तुकड्यामुळे आर्थिक मार्ग होणार मोकळा! जाणून घ्या लाल किताबमधील उपाय
तूळ- ज्योतिषशास्त्रानुसार या राशीवर शनिची अडीचकी सुरु आहे. शनि मार्गी झाल्याने या राशींना फायदा होणार आहे. या राशीची आर्थिक स्थिती या काळात सुधारेल. अचानक धनलाभ होण्याचा योग देखील आहे. काही किचकट अडचणीतून सुटका होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)