Vastu Tips :  आपल्या अवती भोवती सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात नकारात्मक ऊर्जांना वाईट नजर असं म्हणतात. घरात सगळं ठिक आणि आनंदी असताना अचानक सगळं नकारात्मक होतं. सतत घरात कटकट, भांडण, घरातील सदस्य आजारी पडतात, त्यांची कामात प्रगती होत नाही. अशावेळी त्या घराला नजर लागली असं म्हटलं जातं. म्हणजे त्या घराला नकारात्मक शक्तींचा वास असतो असं म्हणतात. (remove negative energy from your house Follow these steps to protect your home from the evil eye Vastu Tips in marathi)


पांढऱ्या वस्तूमुळे घराला नजर लागते!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूर्वीच्या काळात असं मानलं जायचं की, घरातील पांढऱ्या वस्तूमुळे घराला नजर लागायची. म्हणून पूर्वीचे लोक घरातील मीठ, असो किंवा दूध हे दर्शनिय भागात ठेवायचे नाही. म्हणजे त्यावर कोणाची नजर पडणार नाही असं त्या वस्तू ठेवल्या जायच्या. मीठ घरात अशा ठिकाणी ठेवलं जायचं की त्यावर कोणाची नजर पडू नये. एकंदरीतच घरातील पांढऱ्या वस्तूमुळे घराला नजर लागते असा समज होतो. 
तुम्ही कधी जाणवलं का, एका ठराविक काळात घरातील दूध गरम करुन, व्यवस्थित ठेवूनही वारंवार खराब होतं म्हणजे नासतं. अगदी चहा करायला गेलो तरी दूध नासतं. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, आई आणि मुलाचं नातं हे चंद्राला समर्पित असतं. त्यामुळे अनेक वेळा आई मुलांमध्येही वाद पाहिला मिळतात. तुमच्याकडेही असं होत असेल तर ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ डॉ शिरीष कुलकर्णी यांनी नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी यावर उपाय सांगितला आहे. 


वाईट नजरेपासून तुमच्या घराचे रक्षण करण्यासाठी उपाय!


1. घरातील लादी किंवा फरशी ही दोन तीन दिवसांनंतर खडी मिठाच्या पाण्याने पुसून काढावी. 
2. घरातील पांढरे पदार्थ, दूध, मीठ हे व्यवस्थित जागी आणि कोणाला दिसू नये अशा ठिकाणी ठेवा. 
3. तुरटीचे खडे एका पांढऱ्या कागदाच्या कपात घ्या आणि घरातील दर्शन भाग किंवा समोरच्या खोलीत कोणाला सहज दिसतील असे ठेवावे. 



4. शुक्रवारी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अशोकाच्या पानांच तोरण लावावं. 
5. वाईट नजरेपासून वाचण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोराचे चित्र लावणं फायदेशीर असतं.
6. खोलीच्या कोपऱ्यात मीठ शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते. 
7. ताजी फुलं घरात फुलदाणीत ठेवावं. शिवाय ते सुकू लागल्यास ताबडतोब बदलून टाकावी. 


(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)