Sankashti Chaturthi 2023: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दूर्वांचा करा `हा` उपाय, गणपती बाप्पा पूर्ण करतील तुमची इच्छा
Sankashti Chaturthi 2023: हिंदू धर्मात गणपतीच्या पुजेचे विशेष महत्त्व आहे. विघ्नहर्तागणेला प्रिय दूर्वाला खूप महत्त्व आहे. गणपतीची कृपा मिळवण्यासाठी बाप्पाच्या पुजेदरम्यान दूर्वाचा वापर केला जातो.
Sankashti Chaturthi 2023: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी 9 फेब्रुवारी म्हणजेच गुरूवारी येत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, गणपती बाप्पाला दुर्वा गवत खूप आवडते, म्हणून लोक पूजेच्या वेळी हा गवत त्यांना अर्पण करतात. त्याचबरोबर यादिवशी गणपती बाप्पासाठी उपवास करतात. या दिवशी गणपतीला प्रिय असणाऱ्या गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात. असे मानले जाते की गणेशाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण केल्याने त्या व्यक्तीची सर्व विघ्ने दूर होतात आणि गणपती बाप्पा प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.
संकष्टीचे शुभ मुहूर्त
9 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.04 ते 8.26 या दरम्यान शुभ मुहूर्त आहे. यानंतर दुपारी 12.35 ते 1.58 पर्यंत लाभ उन्नती मुहूर्त आणि दुपारी 1.59 ते 3.22 पर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त. या मुहूर्तांमध्ये तुम्ही पूजा करू शकता. उपवासाच्या दिवशी चंद्र 9.18 वाजता उगवेल.
वाचा: व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?
पुजेमध्ये दूर्वाला विशेष स्थान
गणपती बाप्पाला प्रिय असणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्वांचा समावेश होतो. पुजेमध्ये दूर्वाला विशेष स्थान आहे. दूर्वांशिवाय गणपतीची पुजा अपुरी मानली जाते. सोबतच दूर्वाला मंगल कार्ये जसे गृह प्रवेश, मुंडन तसेच विवाहादरम्यान वापरले जाते. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पुजेदरम्यानही दूर्वांचा वापर केला जातो. या दिवशी दूर्वांचे काही उपाय चमत्कारी सिद्ध होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल...
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे उपाय
- जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल आणि तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर गणपती बाप्पाला अथवा लक्ष्मी मातेला गणेश चतुर्थीला अथवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर प्रत्येकी पाच दूर्वांच्या 11 गाठी करून अर्पण करा. असे केल्याने आर्थिक संकटातून मुक्ती मिळते.
- मनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी दूर्वाला गायीच्या दुधात मिसळून त्याच लेप बनवा आणि तो डोक्यावर टिळा म्हणून लावा. असे केल्याने तुमच्या मनीची इच्छा पूर्ण होईल.
- गणेश चतुर्थीच्या दिवशी धनप्राप्ती मिळवण्यासाठी बुधवारी गणपतीला 11 अथवा 12 दूर्वा अर्पण करा. मात्र या दूर्वांची जुडी असायला हवी हे लक्षात ठेवा. असे केल्याने गणपतीची कृपा मिळते.
- गणपतीच्या पुजेत दूर्वांचा वापर केल्याने कुबेरसमान धनप्राप्ती होते.
- बुधवारी अथवा चतुर्थीच्या दिवशी गणेश मंदिरात दूर्वांच्या 11 जुडी चढवल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होतात.