WhatsApp new feature : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये बदल, काय असणार नवीन वैशिष्ट्ये?

WhatsApp new feature : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेक जण व्हॉट्सअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असताना, युजर्सच्या गरजा लक्षात घेत कंपनीकडून अनेक अपडेटही दिले जातात. सध्या व्हॉट्सअॅपवर एक नवीन फीचर (WhatsApp new feature) आले आहे, जे स्टेटसशी संबंधित आहे. जाणून घ्या त्यामधील नवीन बदल... 

Feb 08, 2023, 16:02 PM IST
1/6

व्हॉट्सअॅप (WhatsApp) आपल्या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी नवनवीन फीचर्स आणत असते. युजर्सचा इन्स्टंट मेसेजिंग अनुभव सुधारण्यासाठी अॅप नेहमीच नवनवीन काम करत असते.

2/6

एक भन्नाट फीचर व्हॉट्सअ‍ॅपनं आणलं आहे. या फीचरमुळं चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना आता आपले स्टेटस त्यांच्या स्वत:च्या आवाजात ठेवता येणार आहे. 

3/6

याच्या मदतीने तुम्ही खाजगीरित्या स्टेटस शेअर करू शकता. व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवताना खाजगी प्रेक्षक निवडू शकता. तुमच्याकडे गोपनीयता सेटिंगचा पर्याय असणार आहे. यात फोटो, व्हिडिओ आणि मजकुराच्या व्यतिरिक्त व्हॉइस नोट्स शेअर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.    30 सेकंदांपर्यंतचा ऑडिओ रेकॉर्ड करू शकता आणि ते WhatsApp स्टेटसमध्ये अपडेट करू शकता.

4/6

युजर्सना स्टेटस रिअॅक्शन देखील मिळेल. लोकांनी या फीचरची खूप मागणी केली होती. रिअॅक्शन फीचर गेल्या वर्षी लाँच करण्यात आले होते. आता तुम्ही फक्त एका सोप्या स्वाइपने प्रतिसाद देऊ शकता. 8 इमोजी रिअॅक्शन्सशिवाय, लोकांकडे टेक्स्ट, व्हॉईस मेसेज, स्टिकर्सचा पर्यायही असेल.   

5/6

नवीन फीचर मिळवण्‍यासाठी आधी व्हॉट्सअ‍ॅपचं व्हर्जन अपडेट करावं लागेल. बीटा युजर्सनी अ‍ॅप उघडल्यानंतर स्टेटस विभागात जावे व खालील स्टेप्स फॉलो कराव्यात   

6/6

व्हॉट्सअॅपने हे सर्व अपडेट्स जागतिक स्तरावर प्रसिद्ध केले आहेत. आगामी काळात सर्व वापरकर्ते यात प्रवेश करू शकतात. एका रिपोर्टनुसार, कंपनी डॉक्युमेंट शेअरिंगमध्ये अॅपमधील बॅनरवरही काम करत आहे.