Shani Margi 2023 Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रहांपैकी शनिदेव हा सर्वात महत्त्वाचा आणि प्रभावी असा ग्रह आहे. शनि गा सर्वात संथ गतीने म्हणजे जवळपास अडीच वर्षांने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहावा न्यायदेवात किंवा कर्माचा दाता म्हटला जातो. तो जाचकाला त्याच्या कर्मानुसार फळं देतो. शनी सध्या कुंभ राशीत असून तो लवकरच प्रतिगामी गतीने फिरणार आहे. (saturn direct shani dev November 4 Shani transit 2023 these 3 zodiac signs get lots of wealth till diwali)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेवाची प्रतिगामी स्थिती म्हणजे तो उलटी हालचाल करणार आहे. शनीची मार्ही किंवा थेट चाल ही काही राशींच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. त्यांच्या आयुष्यात सकारात्मक आणि चांगल्या घडामोडी घडतात. येत्या 4 नोव्हेंबर 2023 ला शनिदेव मार्गी होणार असल्याने तीन राशींच्या लोकांना बक्कळ दिवाळीपर्यंत धनलाभ होणार आहे. 


वृषभ (Taurus Zodiac) 


वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचा मार्गी अतिशय शुभ ठरणार आहे. या काळात शनीच्या थेट प्रभाव या राशींच्या लोकांवर पडणार आहे. या लोकांचा आत्मविश्वास वाढणार आहे. कोणतंही काम हातात घ्या त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचं फळं तुम्हाला मिळणार आहे. व्यापाऱ्यांना व्यवसायात लक्षणीय नफा मिळणार आहे. नवीन नोकरीची संधी चालून येणार आहे. 


कर्क (Cancer Zodiac) 


शनी मार्गी कर्क राशीच्या लोकांसाठी वरदानापेक्षा कमी नसणार आहे. तुम्हाला अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. या काळात मित्र आणि कुटुंबाकडून तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य आणि पाठिंबा मिळणार आहे. व्यापारी वर्गासाठी शनिदेव विशेष कृपा बरसणार आहे. या लोकांना व्यवसायातून मोठा नफा मिळणार आहे. या लोकांचे उपक्रम यशस्वी होणार आहेत. नोकरीसंदर्भातील चिंता मिटणार आहे. तुम्हाला अधिक सकारात्मक बदल दिसून येणार आहे. 


हेसुद्धा वाचा - Janmashtami 2023 : 6 की 7 सप्टेंबर, नक्की केव्हा साजरी होईल जन्माष्टमी? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त, आणि महत्त्व


कन्या (Virgo Zodiac) 


कन्या राशीच्या लोकांसाठी दिवाळीपर्यंतचा काळ अतिशय फलदायी आणि लाभदायक सिद्ध होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मान सन्मान आणि तुमच्या कार्याचं कौतुक होणार आहे. तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांचं सहकार्य लाभणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबाची परिस्थितीवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. घरातील वातावरण प्रसन्न असणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )