Shani Gochar Bad Effect : ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात संथ गतीचा ग्रह मानला जातो. शनी कोणत्याही राशीत अडीच वर्षे राहतो. यंदाच्या वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी शनी कुंभ राशीत प्रवेश केला होता. शनी आता  29 मार्च 2025 पर्यंत या राशीत राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनीच्या या गोचरमुळे काही राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र याचा परिणाम काही राशींवर नकारात्मकरित्या देखील पडणार आहे. यावेळी या राशींच्या लोकांना 2025 पर्यंत खूप सावध राहावं लागणार आहे. शनी या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. या राशी कोणत्या आहेत, जाणून घेऊया. 


कर्क रास


कर्क राशीच्या 8 व्या घरात शनी विराजमान आहे. अशा परिस्थितीत शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात. कुटुंबामध्ये अचानक छोट्या गोष्टीवरून कलह वाढण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांच्या कामात वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये अनेक आव्हानं उभी राहू शकतात.


कन्या रास


ज्योतिष शास्त्रानुसार, शनीचं गोचर कन्या राशीच्या लोकांना नकारात्मक परिणाम देणार आहे. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून मन भरकटणार. घरातील व्यक्तीचे आरोग्य बिघडू शकते. कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी. तसंच या राशीच्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या देखील असू शकतात. तुम्ही करत असलेल्या मोठ्या कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. 


वृश्चिक रास


ज्योतिषांच्या मते, शनी वृश्चिक राशीच्या तिसऱ्या आणि चौथ्या घराचा स्वामी आहे. या काळात या राशीच्या लोकांना नोकरी बदलताना काळजी घ्यावी लागेल. प्रेमसंबंधातील नात्यामध्ये वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरातील सदस्यांशी मालमत्तेबाबत वाद होऊ शकतात. व्यावसायिकांसाठीही हा काळ कठीण असू शकतो. 


मीन रास


तुमच्या राशीच्या 12व्या घरात शनि विराजमान आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या खर्चात वाढ होणार आहे. कोणत्याही ठिकाणी मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करू नये. जोडीदाराशी चांगले वागावं लागणार आहे. नवीन नोकरी सुरू करण्याचा विचारही करू नका. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )