Shani Transit 12 July 2022: ज्योतिषशास्त्रात शनि गोचराला विशेष महत्त्व आहे. शनिदेवांना न्यायदेवता म्हणून संबोधलं जातं. त्यामुळे शनिदेव राशीत आल्यानंतर त्या त्या व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. शनि दोष असलेल्या व्यक्तींना आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. आता शनिदेव पाच दिवसांनंतर म्हणजेच 12 जुलै रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तीन राशींना साडेसाती आणि दोन राशींना अडीचकी सुरु होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिदेव 12 जुलैला मकर राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करणार आहे. शनिदेव सध्या कुंभ राशीत गोचर करत आहेत. मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मिथुन आणि तूळ राशीला अडीचकी सुरु होईल. तर धनु, मकर आणि कुंभ राशीचे लोक साडेसातीच्या फेऱ्यात येतील. त्यानंतर 17 जानेवारी 2023 रोजी शनि कुंभ राशीत जातील. तेव्हा धनु, तूळ आणि मिथुन राशींना शनिच्या प्रभावापासून मुक्ती मिळेल. 


ज्योतिषशास्त्रानुसार शनि साडेसाती आणि अडीचकी हा अडचणीचा काळ असतो. या काळात शनिचा प्रभाव असलेल्या व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो. मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नाही. तसेच होणारी कामंही अडकून राहतात. तसेच आर्थिक हानीही होते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)