Budh Gochar: बुध गोचरमुळे तयार होणार शश-बुधादित्य राजयोग; `या` राशींना मिळू शकतं अपार धन
Budh Gochar 2024: कुंभ राशीत बुध आणि सूर्य देवाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. तर दुसरीकडे त्याच वेळी शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने शश राजयोग तयार होणार आहे
Budh Gochar 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहे. येत्या काळात बुध ग्रह गोचर करणार आहे. 20 फेब्रुवारी रोजी ग्रहांचा राजकुमार बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. मुळात या ठिकाणी सूर्य आणि शनिदेव आधीच स्थित आहेत.
कुंभ राशीत बुध आणि सूर्य देवाच्या संयोगामुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. तर दुसरीकडे त्याच वेळी शनिदेव स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने शश राजयोग तयार होणार आहे. या राजयोगांचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना या काळात लाभ होणार आहे.
मेष रास (Aries Zodiac)
शश आणि बुधादित्य राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. अशा परिस्थितीत तुमचे उत्पन्न प्रचंड वाढेल. सामाजिक कार्य करून आध्यात्मिक आनंद अनुभवाल. घरातील सदस्यांमध्ये गोडवा राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहेत. नवीन कामातही यश मिळेल. यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शश आणि बुधादित्य राजयोग अनुकूल ठरू शकतात. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. तुम्हाला व्यवसायात भागीदार देखील मिळू शकेल ज्याला भविष्यात नफा मिळणार आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. संशोधन क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना यावेळी चांगले यश मिळू शकते.
सिंह रास (Leo Zodiac)
या राशीसाठी शश आणि बुधादित्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकेल. नोकरदार लोकांना सरकारी अधिकारी आणि वरिष्ठ लोकांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या आपोआप सुटणार आहे. भागीदारीचे काम सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी काळ अनुकूल आहे. तुमची प्रलंबित कामही पूर्ण होईल. यशाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. कुठूनतरी आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)