Surya Grahan 2023 Ashubh Yog  : वैशाख अमावस्या (Vaishakh Amavasya 2023) आणि सूर्यग्रहणाला (Surya Grahan 2023 ) अवकाशात ग्रहांचा दुर्मिळ संयोग जुळून आला आहे. एकीकडे हंसराज योगामुळे (Hanshraj Yog ) काही राशींच्या लोकांचं नशीब सूर्यासारखं चमकणार आहे. तर याशिवाय दोन ग्रहांचा अशुभ योगही तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांच्या नशीबाला सूर्यग्रहणाला (#SolarEclipse2023) ग्रहण लागणार आहे. (Surya Grahan Effects on Zodiac Signs)


ग्रहांचा दोन अशुभ योग!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हंसराज योगासोबत सूर्य, राहू आणि बुध हे मेष राशीत असणार आहेत. यादिवशी मिथुन राशीत मंगळ आणि मेष राशीत बुध अशुभ योग निर्माण करत आहेत.  हे दोन अशुभ योग ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी अतिशय भयंकर ठरणार आहेत. (Solar Eclipse 2023 and surya grahan 2023 Ashubh Yog can make solar eclipse dangerous three zodiac signs should be alert)


कुठल्या राशींना लागणार ग्रहण ?


मेष (Aries)


ग्रहांचा अशुभ योग हा मेष राशीत होत असल्याने सगळ्यात जास्त परिणाम हा मेष राशीच्या लोकांवर होणार आहे. या राशीच्या लोकांना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. मानसिक स्थिती ढासळणार आहे, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास सांगतात. नोकरीसंदर्भात सध्याच्या स्थितीत कुठलाही निर्णय घेणे घात ठरणार आहे. 


सिंह (Leo)


मेष राशीसोबत या अशुभ योगाचा सिंह राशींच्या लोकांनाही फटका बसणार आहे. होणारी कामंही होणार नाही. काही ना काही अडचणी येणार आहे. या अशुभ योगामुळे आयुष्यात उलथापालट होणार आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासत लक्ष द्यावे नाही तर अडचणींचा सामना करावा लागेल. 


कन्या (Virgo)


कन्या राशीच्या लोकांसाठी ग्रहांचा अशुभ योग अनेक अडचणी घेऊन आला आहे. आर्थिक समस्यापासून आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. आरोग्यासाठी पैशांचा खर्च होणार आहे. कुटुंबात तणावाचं वातावरण असणार आहे. जोडीदारासोबत वादविवाद होणार आहे. 


तूळ (Libra)


तूळ राशीच्या लोकांना अशुभ ग्रहांच्या योग्यामुळे आर्थिक फटका बसणार आहे. जुने आजार डोकं वर काढणार आहे. चांगल्या चांगल्या कामातही अडचणी येणार आहेत. होणारी कामं पण या अडथळ्यामुळे बिघडणार आहेत. कुटुंबातील सदस्याची तब्येत बिघडणार आहे. त्यामुळे कुटुंबात तणाव राहणार आहे. 


मकर (Capricorn)


सूर्यग्रहणातील अशुभ योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात संकटांना सामोरे जावं लागणार आहे. वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून कामाच्या ठिकाणी वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबात आणि कामाच्या ठिकाणी तणावाचं वातावरण राहणार आहे. 


वृश्चिक (Scorpio) 


वृश्चिक राशीच्या लोकांना छुप्या शत्रूंपासून धोका आहे. या अशुभ योगामुळे तुमचे शत्रू तुमच्याविरोधात कट कारस्थान रचणार आहेत. शिवाय या काळात तुम्ही आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. अपघाताची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने गाडी चालवताना विशेष काळजी घ्या. 


हा उपाय करा!


सूर्यग्रहणातील अशुभ योगाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्व राशींच्या लोकांनी तुळशीची पानं पाण्यात टाकून प्यायला हवी, असं ज्योतिषशास्त्र अभ्यासकांनी सांगितलं आहे. 


हेसुद्धा वाचा - Surya Grahan 2023 : सूर्यग्रहणात 84 वर्षांनंतर हंसराज योग! 'या' राशींचं भाग्य सोन्यासारखं चमकणार


 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)