आजचे राशीभविष्य | शुक्रवार | २१ जून २०१९
जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.
मेष- आज तुमचे व्यक्तीमत्वाने इतरांवर प्रभाव टाकाल. मानसिक आरोग्य चांगले राहील. घर, जमीनजुमल्याच्या व्यवहारांसाठी चांगला दिवस. आयुष्यात होत असलेले बदल भविष्यासाठी फायद्याचे ठरतील.
वृषभ- एखाद्या कामासाठी अधिक उर्जा खर्ची करावी लागले. कामाकडे गांभीर्याने पाहिल्यास यश नक्की मिळेल. आज तुम्ही भविष्यातील योजना आखाल. एखादा मोठा निर्णय घेण्याची शक्यता.
मिथून- गोंधलेल्या मानसिक अवस्थेतून बाहेर याल. धैर्य आणि संयमाने गोष्टी हाताळल्यास बहुतांश समस्या सुटतील. धनलाभ होण्याची शक्यता. एखादी सुवार्ता कानावर पडेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील.
कर्क- जुन्या चिंतांपासून मुक्ती मिळेल. नव्या तंत्रज्ञानामुळे कामे सोपे होतील. नव्या वस्तुंच्या खरेदीचा योग संभवतो. व्यवसायात कुटुंबातील व्यक्तींच्या मदतीमुळे यश मिळेल. प्रेमप्रकरणात यश मिळेल.
सिंह- एखादा मोठा निर्णय घेण्याचा विचार कराल. त्यासाठी विश्वासार्ह लोकांकडून सल्ला आणि मदत मिळेल. नव्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न कराल. नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासयोग संभवतो.
कन्या- नोकरी बदलण्याच्यादृष्टीने अनुकूल काळ. मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कोणतेही निर्णय अचूकपणे घ्याल. विवाहासाठी चांगले प्रस्ताव येतील.
तूळ- प्रेमप्रकरणासाठी चांगला काळ. विवाहित व्यक्तींनाही जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. मौजमजा आणि फिरायला जाऊ शकता. एखादी सुवार्ता कानावर पडेल. नोकरीत नवी जबाबदारी किंवा नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.
वृश्चिक- फार मेहनत न करताही यश मिळेल. आगामी काळात ज्यांच्याकडून फायदा होऊ शकेल, अशा व्यक्तींच्या संपर्कात याल. मानसिक स्थिती चांगली असेल. आपल्या बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडाल.
धनु- एखाद्याला मनातील गोष्ट सांगावीशी वाटत असेल तर सांगून टाका. प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण करा, अंतर्मनाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात नव्या लोकांच्या संपर्कात याल. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सन्मान मिळेल.
मकर- एखादी मोठी चिंता दूर होईल. आर्थिक आवक वाढवण्याचे नवे मार्ग दृष्टीपथात येतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांशी चांगली चर्चा होईल. व्यवसायात मित्रांची मदत मिळेल. आरोग्य चांगले राहील.
कुंभ- नोकरी आणि व्यवसायासाठी अनुकूल दिवस. वरिष्ठांशी चांगल्याप्रकारे चर्चा कराल. इतरांना मदत कराल. हितशत्रूंना शह देण्यात यशस्वी ठराल.
मीन- धनलाभ होण्याचा योग संभवतो. नव्या संधी चालून येतील. गुंतवणुकीचा सल्ला विचारपूर्वक घ्या. सहकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करा. एखादी सुवार्ता कानावर पडेल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल.