मेष- आवडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवाल. गुंतवणूक करण्यात भर द्या. कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतात. एकंदर दिवस चांगला आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. स्वतःसाठी आणि जीवनसाथीसाठी थोडा वेळ काढा. आरोग्याकडे लक्ष द्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- दैनंदिन कामांचा व्याप जास्त असेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचा विचार कराल. आरोग्य उत्तम असेल. मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करावा लागेल. समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. धैर्याने पाऊल उचला. दिवसभर पैशांचाच विचार करत राहाल. जमिनीच्या गोष्टी फायद्याच्या ठरणार आहेत.  


मिथुन- स्वतःवर विश्वास असेल तर गोष्टी अधिक चांगल्या होतील. जवळच्या व्यक्तींना नाराज करू नका, असं केल्यास तुम्हाला पश्चाताप होवू शकतो. मेहनतीचं फळ चांगलं मिळेल. प्रयत्न करणं सोडू नका. अचानक धन लाभ होवू शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. 


कर्क- धार्मिक कामात अधिक रस घ्याल. गुंतवणुकीकडे लक्ष द्या. येत्या काळात गुंतनणूक कामी येईल. कुटुंबात ज्येष्ठ व्यक्तीची तब्येत खराब होवू शकते. जबाबदाऱ्या वाढतील. कोणाचं मन दुःखवू नका. जीवनसाथीकडून भेट वस्तू मिळू शकेल. जास्त खर्च केल्यामुळे पार्टनरसोबत विवाद होवू शकतो.  


सिंह- अपेक्षांच्या बाबतील संतुलित असाल. वरिष्ट तुमच्या कामाने प्रभावित असतील. नोकरीच्या ठिकाणी असणारा तणाव कमी होईल. सध्याच्या स्थितीत काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात. तुम्हाल्या देखील योग्य सल्ला मिळण्याची गरज आहे. ज्यामुळे तुम्हालाही आनंद मिळेल. महत्त्वाकांक्षी असाल. 


कन्या- नोकरी आणि व्यापारात नवी पावलं उचलालय कामात नवे प्रयत्न करा, त्यात यशस्वी व्हाल. दिवस चांगला आहे. ज्या गोष्टींचा विचार करताय त्यात यश मिळेल. साथीदारासोबत चांगला वेळ व्यतीत कराल. दैनंदिन कामं पूर्ण होतील. दुसऱ्यांच्या राजकारणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. 


तुळ- विचारात असणारी कामं सुरू करा. फायदाच होईल. दिवस चांगला आहे. सामूहिक आणि सामाजिक कामांसाठी दिवस चांगला आहे. मित्रांना जास्त वेळ द्याल. गुंतवणूकीचे बेत आखाल. धनलाभ होऊ शकतो. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. 


वृश्चिक- उत्साही असाल. नव्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. अनेक लोकं तुमच्या मदतीसाठी तयार असतील. कोणाची मदत करण्याआधी स्वत:चं हातातलं काम पूर्ण करा. नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. नव्या नोकरीत बढती मिळू शकते.  


धनु- समजूतदारपणाचा वापर करा. कामाच्या ठिकाणी ओळखीच्या व्यक्तींची मदत होईल. नवे करार फायद्याचे ठरतील. दिवस चांगला असेल. नशिबाची साथ आहे. अडकलेले पैसे मिळतील. तुमच्यासाठी आजचा दिस खास असेल. काही असे प्रसंग समोर येतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल. 


मकर- धनलाभ होण्याची चिन्हं आहेत. दुसऱ्यांच्या सुचनांचा आदर करणं गरजेच आहे. प्रदीर्घ काळासाठी चालणाऱ्या एखाद्या कामाचा फायदाच होईल. अनेक विचार आणि योजना आखाल. बुद्धीचातुर्याने कामं पूर्ण कराल. अविवाहितांचे विवाह प्रस्ताव मार्गी लागतील. मित्र आणि कुटुंबाचं सहकार्य लाभेल. शुभवार्ता कळेल. आनंदी असाल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला असेल. 


कुंभ- जुन्या अडचणी दूर होतील. स्वत:वर लक्ष द्या. दुसरे काय सांगतात ते ऐका. नवे कपडे खरेदी करा. जास्तीत जास्त प्रमाणात सक्रिय असाल. समाज आणि कुटुंब अशा दोन्हीकडील महत्त्वाची कामं पूर्ण कराल. अनेक कल्पना सुचतील. खर्चांवर ताबा ठेवा. यशस्वी होण्यासाठी धीर राखा. मित्रांची मदत मिळेल.  


मीन- दोघांच्या भांडणात फसण्याची शक्यता आहे. समस्या सोडवण्यासाठी त्यात उतरावं लागेल. कामाच्या व्यापासोबतच जबाबदारी वाढेल. दिवस व्यग्र असेल. व्यापाराच्या काही जबाबदाऱ्या पार पाडाल. नोकरीच्या ठिकाणी शांतता असेल. अडचणींचा सामना करण्यासाठी योजना आखाल.