राशीभविष्य : `या` राशीच्या व्यक्तींना धैर्याने वागावे लागेल
असा असेल तुमचा आजचा दिवस
मेष - जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. वायफळ खर्च टाळा. मोठ्या गोष्टी बोलू नका. धावपळ होऊ शकते. एखादी व्यक्ती तुमचा चुकीचा फायदा घेऊ शकते. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. सांधेदुखी, अॅलर्जी होऊ शकते. गुंतवणूक करताना सावध राहा. धनहानी होऊ शकते. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.
वृषभ - अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. तुमच्या मनातील गोष्ट योग्यरित्या सांगता येणार नाही. तब्येत ठिक राहील.वाद होऊ शकतात. मेहनत वाढेल. छोट्या गोष्टींबाबत ताण घेऊ नका. काही कामात उशिर होऊ शकतो. धैर्याने वागावे लागेल. पैशांच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय स्वत: घेऊ नका.
मिथुन - उत्पन्न वाढवण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी इतरांची मदत मिळेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. फिरण्याचा प्लान करु शकता. नोकरदारवर्गाला नवीन कामाच्या शोधात असल्यास ते मिळू शकतं. एखाद्या गोष्टीबाबत गैरसमजाची स्थिती उद्भवू शकते. पोटदुखी होऊ शकते.
कर्क - नोकरदारवर्गासाठी दिवस अनुकूल आहे. बढतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. ऑफिसमध्ये काही नवीन काम मिळू शकते, त्यात यशस्वी व्हाल. एखादी जवळची व्यक्ती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. प्रेमसंबंधांसाठी दिवस ठिक आहे.
सिंह - व्यवसायिकांसाठी फायद्याचा दिवस आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. अविवाहितांना लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतात. दिवस चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा दिवस आहे. करियरमध्ये पुढे जाण्यासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा. जरुरी चेकअप वेळेत करा.
कन्या - जोखमीची कामं करु नका. उधार दिलेले पैसे परत मिळण्यास त्रास होईल. वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्याआधी विचार करा. जुन्या गोष्टींमुळे समस्या वाढू शकतात. विद्यार्थ्यांना मेहनतीचे काही कमी परिणाम येऊ शकतात. अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो. घाईत कोणतंही काम करु नका. जुन्या आजारांपासून काही प्रमाणात आराम मिळेल.
तुळ - आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे. पती-पत्नीमधील गैरसमज कमी होतील. वैवाहिक जीवन सुखकारक राहील. विद्यार्थ्यांसाठी दिवस काहीसा ठिक नाही. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक मदत मिळेल. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. स्वत:च्या तब्येतीकडे लक्ष द्या.
वृश्चिक - कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. व्यवसायात काही महत्त्वाची कामं अपूर्ण राहू शकतात. अधिकाऱ्यांची मदत मिळणार नाही. कायद्याच्या कामात विचार करुन निर्णय घ्या. काही लोकांशी तणावपूर्ण संबंध राहतील. ऑफिस आणि व्यवसायात नवीन आव्हानं मिळू शकतात.
धनु - एका वेळी अनेक कामं हाती घेऊ नका. त्यामुळे समस्या वाढू शकतात. कामात मन लागणार नाही. काही प्रकारच्या सूचना मिळू शकतात. स्वत:च्याच मेहनतीवर असंतृष्ट राहाल. अंगदुखी, डोकेदुखीमुळे त्रास होऊ शकतो.
मकर - व्यवसायात फायदा होईल. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. नवीन कामाची सुरुवात करु शकता. कोणत्याही गोष्टीला अधिक ताणू नका. तब्येत ठिक राहील.
कुंभ - व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. जोडीदारासोबत फिरण्याची योजना आखू शकता. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे. तब्येत ठिक राहील. डोकेदुखी होऊ शकते. वाद होऊ शकतात. शांत राहा.
मीन - सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. अधिकाऱ्यांची मदत मिळेल. नशिबाची साथ मिळेल. नोकरी, व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी दिवस चांगला आहे. अचानक येणाऱ्या समस्यांचा सामना कराल. घाई करु नका. एखाद्या गोष्टीबाबत मनात चिंता राहील.