Surya Gochar : सूर्य देव दर एका महिन्यानंतर राशी बदलतात. जन्माच्या चंद्रापासून तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या भावात स्थित असलेले ग्रह राशीच्या लोकांसाठी सकारात्मक परिणाम देतात. 16 जुलै रोजी सूर्य देव चंद्राची राशी म्हणजेच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान सूर्याच्या गोचरचा काही राशींना फायदा राशींना फायदा होईल.


मेष रास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याचे गोचर या राशींच्या व्यक्तींसाठी अधिक लाभदायक ठरणार आहे. हे गोचर मेष राशीच्या लोकांच्या जीवनात चांगली बातमी घेऊन येणार आहे. या काळात तुम्हाला पदोन्नतीची अधिक शक्यता असेल. आर्थिक बाबतीत मजबूत राहू शकणार आहात. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगती होणार आहे. शिक्षण क्षेत्रात योग्य परिणाम मिळण्याची शक्यता देखील खूप जास्त आहे. तुम्ही आर्थिक अडचणींवर मात करू शकणार आहात. 


मिथुन रास


सूर्य गोचरमुळे या राशीच्या राशीच्या लोकांना जीवनात महत्त्वपूर्ण लाभ मिळणार आहे. तुम्हाला मित्रांकडूनही पाठिंबा मिळणार आहे. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.  व्यवसायांसाठी कार्यक्षम सौद्यांमुळे आर्थिक नफा मिळण्याची शक्यता आहे. सध्याच्या नोकरीमध्ये तुम्ही पगारवाढीची अपेक्षा करू शकते. वेळेवर महत्त्वाचे निर्णय घ्या. समाजात आदर वाढू शकणार आहे.


कर्क रास


ग्रहाच्या या गोचरमुळे या राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळतील. आरोग्याशी संबंधित समस्याही नियंत्रणात राहणार आहेत. वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होणार आहे. कौटुंबिक नात्यात बळ येणार आहे. सध्याच्या नोकऱ्या बदलण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सूर्याच्या या गोचरमुळे व्यवसायाच्या आकडेवारीत प्रगती होणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे.  


तूळ रास


तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य अकराव्या घराचा स्वामी आहे. या काळात या राशीच्या व्यक्तींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता सकारात्मक आहे. आत्मविश्वासाने कार्ये पूर्ण करण्यास मदत होणार आहे. कुटुंबातील संबंध सुधारण्याची शक्यता जास्त आहे. आयुष्यात काही संघर्षांना सामोरं जाणं सोपं होणार आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )