मुंबई: सामुद्रिक शास्त्रानुसार शरीराची रचना, चिन्हे आणि खुणा आधारे मनुष्याचे नशीब आणि स्वभावाचा अंदाज घेतला जातो. व्यक्तीच्या शरीरावर असलेल्या काही खुणा त्याच्या भविष्याबद्दल आणि आर्थिक स्थितीबद्दल सांगतात. काही खुणा किंवा तीळ व्यक्तीच्या जीवनातील पैशाशी संबंधित माहिती देतात. म्हणजे माणूस आयुष्यात श्रीमंत होईल की नाही हेही सामुद्रिक शास्त्रानुसार ठरवलं जातं. शरीराच्या अवयवांची रचना ते भाग्यवान असल्याचे दर्शवते. आज आपण अशाच व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असे पुरुष भाग्यवान असतात


  • सामुद्रीक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची पाठ कासवासारखी उंचावली आहे, त्यांना भाग्यवान मानले जाते. हे लोक जीवनात खूप मान-सन्मान मिळवतात.

  • तळहाताच्या मध्यभागी तीळ असणाऱ्या पुरुषांच्या नशिबात सुख-समृद्धी असते. वाहन हा सुख मिळतं. जीवनात मान-सन्मान मिळतो. तसेच या लोकांना पैशाची कमतरता भासत नाही.

  • सामुद्रिक शास्त्रात सांगितले आहे की रुंद छाती आणि लांब नाक असलेल्या पुरुषांची अगदी लहान वयातच प्रगती होते. 

  • पुरुषाच्या पायाची तर्जनी म्हणजेच अंगठ्यासह बोट मोठे असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो.

  • छातीवर दाट केस असलेले पुरुषही आयुष्यात भरपूर पैसे कमावतात. सुखाची प्राप्ती होते. हे लोक स्वभावाने खूप समाधानी असतात.

  • ज्या पुरुषांच्या पायावर कमळ, रथ, बाण अशी चिन्हे असतात, ते पुरुष अभिमानाने जगतात. या लोकांचे जीवन आनंदाने भरलेले असते.

  • नाभी खोल आणि गोलाकार असणे देखील भाग्यवान असल्याचे लक्षण आहे. ज्या पुरुषांची नाभी अशी असते, त्यांच्या आयुष्यात कधीही गरिबी येत नाही.


(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे. अधिक बातम्यांसाठी फॉलो करा 24 Tass.com )