Thursday panchang : आज अहोई अष्टमीसह गुरु पुष्य योग! धनत्रयोदशीपूर्वी आज सोने खरेदीसाठी सुवर्ण संधी, जाणून घ्या शुभ मुहूर्त
24 October 2024 Panchang : आश्विन महिन्यातील आज अष्टमी तिथी असून आजच गुरु पुष्य योगासह अहोई अष्टमीचं व्रत आहे.
Panchang 24 October 2024 in marathi : आज दिवाळीपूर्वी खरेदीसाठी शुभ योग जुळून आलाय. गुरुवारी 24 ऑक्टोबरला पुष्य नक्षत्र असल्याने गुरु पुष्य किंवा मिनी धनत्रयोदशी आहे. या योगात खरेदी आणि नवीन सुरुवात शुभ मानली जाते. दरवर्षी पुष्य नक्षत्र दिवाळीच्या सात दिवस आधी येते. दिवाळीची खरेदीही या दिवसापासून सुरू होते. नवीन काम किंवा व्यवसायही सुरू होईल. तसंच आज या दिवशी महालक्ष्मी, सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी, पारिजात, बुधादित्य आणि पर्वत योगही तयार होत आहेत. आज दिवसभर गुरु पुष्य योग असल्याने तुम्ही दिवसभर कधीही खरेदी करु शकता.
त्यासोबत आज अहोई अष्टमीचं व्रत आहे. माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी निर्जला व्रत आणि अहोई मातेची पूजा करतात.
आज पंचांगानुसार (Panchang Today) गुरु पुष्य योग, साध्य योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग जुळून आला आहे. चंद्र आज कर्क राशीत आहेत. (thursday Panchang)
तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित करण्यात आलाय. गुरुवार हा दिवस भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे आज श्री स्वामी समर्थ, साईबाबा आणि गजानन महाराज यांची उपासना करण्यात येणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (thursday panchang 24 october 2024 panchang in marathi ahoi ashtami Guru Pushya Yog 2024)
पंचांग खास मराठीत! (24 october 2024 panchang marathi)
वार - गुरुवार
तिथी - अष्टमी - 26:01:26 पर्यंत
नक्षत्र - पुष्य - पूर्ण रात्र पर्यंत
करण - बालव - 13:35:33 पर्यंत, कौलव - 26:01:26 पर्यंत
पक्ष - कृष्ण
योग - साघ्य - 29:21:37 पर्यंत
सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ
सूर्योदय - 06:27:51
सूर्यास्त - 17:42:15
चंद्र रास - कर्क
चंद्रोदय - 23:55:00
चंद्रास्त - 13:24:00
ऋतु - हेमंत
हिंदू महिना आणि वर्ष
शक संवत - 1946 क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 11:14:24
महिना अमंत - आश्विन
महिना पूर्णिमंत - कार्तिक
आजचे अशुभ मुहूर्त
दुष्टमुहूर्त - 10:12:39 पासुन 10:57:37 पर्यंत, 14:42:25 पासुन 15:27:23 पर्यंत
कुलिक – 10:12:39 पासुन 10:57:37 पर्यंत
कंटक – 14:42:25 पासुन 15:27:23 पर्यंत
राहु काळ – 13:29:21 पासुन 14:53:39 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 16:12:20 पासुन 16:57:18 पर्यंत
यमघण्ट – 07:12:49 पासुन 07:57:47 पर्यंत
यमगण्ड – 06:27:51 पासुन 07:52:10 पर्यंत
गुलिक काळ – 09:16:28 पासुन 10:40:45 पर्यंत
शुभ मुहूर्त
अभिजीत - 11:42:35 पासुन 12:27:32 पर्यंत
दिशा शूळ
दक्षिण
ताराबल आणि चंद्रबल
ताराबल
अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती
चंद्रबल
वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)