मुंबई : नक्षत्र आपली दिशा सतत बदलत असतात. या नक्षत्रांचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होत असतो. जाणून घेऊया आजचे राशीभविष्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेष - काही कामांमध्ये अडथळा येऊ शकतो त्यामुळे मेहनत अधिक करावी लागेल. नोकरी बदलण्याचा विचार करू शकता मात्र निर्णय अगदी विचारपूर्वक करावा. कोणत्याही कामात घाई केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. तब्बेतीबाबत सावधान राहा. नवीन मोबाइल खरेदी करू शकता. 


वृषभ - बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. सोबत काम करणाऱ्या व्यक्तींकडून मदत होऊ शकते. जोडीदाराकडून मदत मिळू शकते तर अविवाहित असणाऱ्यांना प्रेमात फायदा होऊ शकतो. आपल्या कामकाजात बदल होण्याची शक्यता आहे पण त्याचा फायदाच होईल. 


मिथुन - नक्षत्रांची स्थिती खास आहे. आज तु्म्ही सक्रीय असाल. ऑफिसमध्ये नवीन काम आणि नवीन जबाबदारी मिळेल. थांबलेली सर्व काम पूर्ण होतील. प्रियकराकडून धन लाभ होऊ शकतो. काही नवीन लोकं तुमच्याशी जोडली जातील. 


कर्क - आज तुम्ही ऑफिसमध्ये लोकांना कामाने इम्प्रेस करू शकता. नोकरी बदलण्याचा किंवा वेगळं काम करण्याचा विचार करू शकता. यामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. नवीन सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. अचानक धन लाभ होईल. 


सिंह - आज अधिकाऱ्यांकडून सहयोग फार कमी मिळेल. त्यामुळे बिझनेसमध्ये सावधान रहावं लागेल. ऑफिस किंवा बिझनेसमध्ये जे काम हाती घ्याल त्यामध्ये यश मिळेल. व्यवसायात मोठ्यांचा सल्ला घ्या. एकटेपणा टाळा. अर्धवट राहिलेली काम पूर्ण होतील. 


कन्या - आज बिझनेस किंवा नोकरीमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती बदलेले. स्थिती बदलण्यासाठी आणि खर्च कमी करण्याचा विचार करू शकता. घाई करू नका. 


तूळ - काही अर्धवट राहिलेली काम पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात योग्य वेळी मदत मिळणार नाही त्यामुळे त्रास होऊ शकतो. काही लोकं तुमच्या कामाला विरोध करू शकतात. आजच्या दिवशी काही तरी नवीन करण्याचा विचार करा. 


वृश्चिक - व्यवासायात लाभ होईल. नोकरदार वर्गाकरता आजचा दिवस चांगला आहे. थांबलेली सर्व काम होतील. जुनी दुखणी डोकं वर करतील. नवीन काम करण्याचा विचार कराल. काही मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाल. जोडीदाराची मदत आज होऊ शकतात. 


धनू - नोकरदार वर्गाच्या कामांत अडथळा येऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी सावधान राहा. कायदेशीर काम डोकं वर करतील. फालतू कामांमध्ये वेळ जाण्याची शक्यता असते. प्रियकरासोबत काही बदल कराल. या राशीच्या अविवाहित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. 


मकर - जुना त्रास संपण्याची शक्यता असते. स्थिती अनुकूल होऊन रखडलेली काम पूर्ण होऊ शकतात. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना नवीन आयडिया मिळू शकतात. दिवसभरात पॉझिटीव्ह एनर्जी राहील. जोडीदारासोबत वाद होईल. 


कुंभ - करिअरकरता कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला आहे. ऑफिसमधून सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. काही चांगले आणि मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात अनुभवी लोकांकडून चांगला सल्ला मिळेल. धन लाभ होईल. 


मीन - अचानक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. पार्टनर देखील तुमची मदत करेल ज्यामुळे धन लाभ होईल. जुनं कर्ज संपेल. फालतू खर्चांवर कंट्रोल करा. नवीन काम मिळण्याची दाट शक्यता होईल. ऑफिसमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळतील.