मेष- आज बोलण्यावर ताबा ठेवा. अनियमित दिनचर्येमुळे थकवा जाणवू शकतो. आत्मविश्वास असावा, पण अतिआत्मविश्वास नको. अतिउत्साहात कोणतीही गुंतवणूक करु नका. कामाचा व्याप वाढेल. आरोग्य सामान्य असेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृषभ- व्यापारात आत्मनिर्भर असाल. नव्या ओळखी होतील. कामाचा व्याप वाढेल. इतरांचं सहकार्य मिळेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत बदल आणि चांगल्या सुधारणा होतील. 


मिथुन- आर्थिक गुंतागुंत निकाली निघेल. नव्या ओळखीचा फायदा होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मनाजोगी बदली किंवा स्थलांतर मिळेल. जड आहार अडचणीत आणू शकतो. 


कर्क- नोकरीमध्ये पदोन्नतीचा योग आहे. स्वत:च्या व्यवसायावर लक्ष द्या. नोकरीशी निगडीत अडचणी दूर होतील. दिवसभर थकवा जाणवू शकतो. 


सिंह- व्यवसाय चांगला चालेल. तुमचं एखादं अतिशय महत्त्वाचं काम पूर्ण होईल. आरोग्य उत्तम असेल. व्यक्तिगत प्रश्न निकाली निघतील. गुंतवणूकीच्या योजना आखाल. 


कन्या- स्वत:च्या कामावर लक्ष ठेवा. काही मित्र आणि नातेवाईक आज जास्त महत्त्वाचे असतील. नवं आणि सकारात्मक काम हाती घ्याल. आयुष्य सुधारु शकेल. 


तुळ- नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत भावनांच्या आधारे जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका. वादांमध्ये अडकाल. जुने वाद पुन्हा डोकं वर काढतील. कौटुंबीक समस्या वाढतील. 


वृश्चिक ­ - व्यवसायात काही नव्या घडामोडी घडतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. अविवाहितांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहप्रस्ताव येतील. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. 


धनु- नोकरीमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतील. मिळकत वाढेल. जुन्या गोष्टी आठवतील. तुमच्या व्यवहारकौशल्याने वरिष्ठ प्रभावित होतील. 


मकर- व्यापार आणि नोकरीमध्ये फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा. प्रतीपथावर वाटचाल कराल. तुमच्या भावनांचा आदर केला जाईल. 



कुंभ- नोकरीच्या ठिकाणी जास्त काम असेल. काही व्यक्ती तुमच्याकडून काम करुन घेण्याचा प्रय्त्न करतील. सावध रहा. मानसिक ताण असल्यामुळे कामावर कमी लक्ष असेल. 


मीन- बेरोजगारांसाठी आजचा दिवस चांगला आहे. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. समाजात सन्मान मिळेल. कुटुंबातील नातेसंबंध सुधारतील. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढतील.