Ganpati Pratisthapana Pooja: दोन वर्षांच्या कोरोना महासंकटानंतर मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात यावर्षी गणरायाचं आगमन होणार आहे. त्यामुळे घरोघरी आणि मंडळात एक वेगळाच उत्साह पाहिला मिळतो आहे. यंदा अनेकांच्या घरी पहिल्यांदाच गणरायचं आगमन होणार आहे. मग जर तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पाचं भक्तीभावाने रितसर पूजा करुन प्राणप्रतिष्ठा करायची आहे. मात्र तुम्हाला गुरूजी मिळत नाही आहे. अशात आता काय करायचं असा प्रश्न जर तुमच्यासमोर पडला असेल तर आज आम्ही तुम्हाला मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा सांगणार आहोत.


लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा कशी करणार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आपल्या लाडक्या गणरायची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला कुठले पूजेचे साहित्य हवे आहेत, ते सांगणार आहोत. त्याशिवाय आम्ही दिलेल्या व्हिडीओद्वारे तुम्ही लाडक्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा करु शकता. तुम्ही घरच्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करू शकतात आणि आपल्यासाठी पूजेच्या साहित्यापासून मंत्रोच्चारासहित संपूर्ण पूजा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. (trending news ganesh chaturthi 2022 and ganpati pratisthapana pooja at home vidhi with mantra)


गणपती प्रतिष्ठापना पूजेचं साहित्य


–  गणपती मूर्ती
– हळद, कुंकू, अक्षता, गुलाल, अष्टगंध, अक्षता
– 10 सुपार्‍या, 5-5 खारीक, बदाम, हळकुंड, अक्रोड
– रेशीम कापड, कापसाची वस्त्रे, 2 जानवी जोड, 1 पंचा,
– तांदूळ, तुळस, बेल, दुर्वा, फुले, पत्री, हार, आंब्याच्या डहाळे
– 2 नारळ, 5 फळे, 25 विड्याची पाने
– कच्चे दूध, दही, शुद्ध तूप, साखर, मध,
– कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, सुटे पैसे.
– चौरंग, आसन, नैवेद्याची तयारी, समई, वाती, निरांजन, कापूर.
– हात पुसण्यासाठी फडके, देवाचे अंग पुसण्यासाठी कापड
– कापसाची वात, चार लहान वाट्या, चंदन, दूर्वा. 


गणेश पूजेचा शुभ मुहूर्त? (Ganesh Puja Shubh Muhurt)


सकाळी 7 वाजून 05 मिनिटं ते 8 वाजून 40 मिनिटांपर्यंत गणेश पूजेचा अमृत योग (Amrut Yog) आहे 
सकाळी 10 वाजून 15 मिनिटं ते 11 वाजून 50 मिनिटांपर्यंत गणेश पूजेचा शुभ योग (Shubha Yog ) आहे 


अशी करावी पूजा…


या व्हिडीओमध्ये गुरुजी तुम्हाला गणपतीची विधीवत पूजा-अर्चा सांगणार आहेत. तेव्हा गणरायाची प्राणप्रतिष्ठापणा करताना हा व्हिडीओ लावल्यास तुम्ही अगदी भक्तीभावाने पूजा करु शकता.