Tulsi Vivah 2022 Upay: तुमचं जोडीदारासोबत पटत नाही ? तुळशीविवाहाच्या दिवशी करा हे उपाय..
हे उपाय केल्याने वैवाहिक जीवनान सुख आणि समाधान प्राप्त होते (Tulsi Vivah Upay for Marriage Life) असे मानले जाते. तसेच या उपायांमुळे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवाही वाढतो अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
Tulsi Vivah Upay: कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांनी योगनिद्रातून जागे होतात आणि भगवान शिवाकडून पदभार स्वीकारतात.
या दिवशी उपासना आणि उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुळशी विवाह (Tulsi Vivah 2022) दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला केला जातो.
पंचांगानुसार यंदा तुळशी विवाह आज 5 नोव्हेंबरला होत आहे. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूचे आराध्य दैवत शालिग्रामशी होतो.
तुळशी विवाह हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो.पुराणात या दिवसाच्या संदर्भात काही खास उपाय (Tulsi Vivah Upay) सांगितले आहेत.
आणखी वाचा: Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही
हे उपाय केल्याने वैवाहिक जीवनान सुख आणि समाधान प्राप्त होते (Tulsi Vivah Upay for Marriage Life) असे मानले जाते. तसेच या उपायांमुळे पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि गोडवाही वाढतो
अशी धार्मिक श्रद्धा आहे. हे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.
तुलसी विवाहाचे महत्व (Tulsi Vivah 2022 Significance)
जर तुमच्या वैवाहिक नात्यात कटुता असेल खटके उडत असतील,वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी तुलसी विवाह अत्यंत शुभ मानला जातो.
आणखी वाचा: आजचं पंचांग 5 November 2022 : काय असेल आज राहुकाळ स्थिती , जाणून घ्या आजचे शुभ-अशुभ मुहूर्त
हिंदू शास्त्रानुसार लग्नकार्यात अडचणी येत असतील, लग्न ठरत नसतील, ठरलेलं लग्न मोडत असेल तर आज तुलसी विवाहाच्या दिवशी काही खास उपाय करून तुम्ही मार्ग काढू शकता.
अशी मान्यता आहे कि तुळशीविवाहाच्या दिवशी माता तुळशी आणि भगवान शालिग्राम यांना साक्षी मानून एखाद्या गरजू व्यक्तीच्या मुलीच्या लग्नात आपल्या कुवतीनुसार दान करण्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि हे दान गुप्त ठेवावे. यामुळे भगवान श्री विष्णूजी प्रसन्न होतात आणि विवाहातील, तसेच वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते.
तुळशी विवाहाच्या दिवशी या मंत्राचा करा जप (Tulsi Vivah Mantra)
‘महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी,
आधि व्याधि हरा नित्यं तुलसी त्वं नमोस्तुते’
तुळशीच्या पानांना किंवा रोपाला स्पर्श करताना या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा नियमित जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते.
सुखी वैवाहिक जीवनासाठी करा हे उपाय
वैवाहिक जीवनात काहीही अडचणी असतील तर तुलसी विवाहाच्या दिवशी असे काही उपाय आहेत जे केल्याने तुमचं वैवाहिक नातं आनंदाने नांदू लागेल. मनापासून हे उपाय केल्यास वविवाहिक आयुष्यात प्रेम आनंद भरभरून राहील असं म्हटलं जात.
काय आहेत उपाय
तुळशीविवाहाच्या दिवशी पती-पत्नीने पवित्र नदीत स्नान करावे. हे शक्य नसेल तर पवित्र नदीचे पाणी घरू आणून ते आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करावी.
तुळशीची पानं पाण्यात टाका आणि हे पाणी संबंध घरभर शिंपडा सर्व नकारात्मकता दूर होईल,पती पत्नीमधील मतभेद दूर होऊन ववैहिक जीवनात आनंदी आनंद येईल.
तुळशी विवाहाच्या दिवशी पती-पत्नीने तुळशीमातेला लाल चुनरी आणि सोळा श्रृंगार अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास घरात तुळशीविवाह करावा. असे केल्याने वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतात असे मानले जाते.