Vastu Shastra on Lizard: धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता असते. अशात अनेक जणांना रोज राशीभविष्य वाचण्याची सवय असते. आपल्या सोबत भविष्यात काय होणार हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं. असं म्हणतात तुमच्या बाजूला घडणाऱ्या गोष्टीतून तुम्हाला शुभ आणि अशुभ गोष्टींचं संकेत मिळत असतात. (vastu shastra on lizard signs  If you see lizard in the house of is a very bad sign)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घराच्या खिडकीत कावळा ओरडला की म्हणतात, पाहुणे येतात. तसाच अनेक घरांमधील एक सदस्य ज्याची सगळ्यांना आणि खास करुन महिलांना जास्त भीती वाटते. आलं का लक्षात तुमच्या अहो तुमच्या घरातील पाल. हो, जो आपल्याला विविध रुपाने  आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देतो. आज आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्हाला पाल दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात ते. 


घराच्या मंदिरात पाल दिसली तर...


शास्त्रानुसार पाल हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेले हे कीटक खाऊन घर साफ करत राहते. अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाल दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे. पूजेच्या खोलीत पाल दिसणे हे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे.


नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास...


नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा. याचा अर्थ असा की नजीकच्या काळात घरातील प्रमुख आजारी पडणार आहे, ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल. त्याचप्रमाणे पाल जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही. असे दृश्य दिसल्यास नवीन घर-दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा अवश्य करा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल, ज्योतिष्याशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 


दोन पालींना एकत्र लढताना पाहणे...


घर किंवा ऑफिसमध्ये पाल एकमेकांशी भांडताना दिसली तर ते अशुभ लक्षण मानलं जातं. याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे. पाल आपापसात भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे. असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.


पाल पायावर पडणे..


पाल रात्री घराच्या भिंतींवर जास्त हालचाल करतात. तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते. वास्तुशास्त्रानुसार, जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. दुसरीकडे, डाव्या टाचेवर किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे.


पाल स्वप्नात दिसली तर...


जर तुम्हाला स्वप्नात एखादी पाललाथ मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं. याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जातं नाही. भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचं हे लक्षण आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)