Samsaptak Yoga : आज शुक्र राहूचा समसप्तक योग! `या` राशींवर बरसणार पैशांचा पाऊस
Samsaptak Yoga : आज शुक्र आणि राहूचा समसप्तक योग तयार झाला आहे. यासोबतच या दिवशी पंचांगानुसार अनेक शुभ योग जुळून आले आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
Shukra Rahu / Samsaptak Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र आणि राहू दोघेही एकमेकांपासून सप्तम भावात असणार आहे. शुक्र आणि राहूच्या या स्थितीमुळे समसप्तक योग निर्माण झाला आहे. त्यासोबत वृद्धी योग, ध्रुव योग आणि श्रवण नक्षत्र यांच्या संयोगदेखील जुळून आला आहे. त्यामुळे आजचा रविवार 19 नोव्हेंबर 2023 ला काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. कुठल्या आहेत त्या लकी राशी जाणून घ्या. (Venus Rahu Samsaptak Yoga today 19 november 2023 Rain of money will fall on these zodiac signs)
वृषभ रास (Taurus Zodiac)
वृषभ राशीच्या लोकांसाठी समसप्तम योग अतिशय शुभ सिद्ध होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाच्या कृपेमुळे आर्थिक लाभ होणार आहे. वाहन किंवा जमीन खरेदीचे शुभ संयोग जुळून आला आहे. सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे. सहलीतून भविष्यात चांगला फायदा होणार आहे.
कर्क रास (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी समसप्तम योग भाग्यशाली ठरणार आहे. सूर्यदेवाच्या प्रभावामुळे तुम्ही मोठे निर्णय सहजपणे घेऊन फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा होणार आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर रविवारचा दिवस आनंदी असणार आहे. नवविवाहितांना आनंदाची बातमी मिळणार आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
समसप्तम योगामुळे 19 नोव्हेंबर हा शुभ योग सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला सिद्ध होणार आहे. या लोकांना कामाच्या ठिकाणी फायदा होणार आहे. व्यवसायात चांगल्या सोबत नवीन योजना हाती घेणार आहात. प्रेम जीवनातील लोकांमध्ये नवीन उर्जा येणार आहे. ज्यामुळे त्यांच्या नातेही मजबूत होणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यक्रमांमध्ये रस वाढणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही धार्मिक स्थळी भेट देणार आहे.
हेसुद्धा वाचा - Sahni Guru Horoscope 2024 : शनि आणि गुरू देवाच्या कृपेने 2024 मध्ये अच्छे दिन! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा
कन्या रास (Virgo Zodiac)
समसप्तम योगामुळे 19 नोव्हेंबर हा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने उर्जेने परिपूर्ण होणार आहे. ज्यामुळे सर्व कामं सहज पूर्ण होणार आहे. नोकरी करणारे लोक सुट्टीचा पुरेपूर आनंद घेणार आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेने चांगला नफा कमावण्यात यशस्वी होणार आहात. तुम्हाला तुमच्या वडिलांच्या किंवा सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने एखादी मौल्यवान वस्तू लाभणार आहे.
वृश्चिक रास (Scorpio Zodiac)
समसप्तम योग हा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या लोकांना अनेक फायदे होणार आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढणार आहे. तुम्ही अपूर्ण कामं पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. सूर्यदेवाच्या कृपेने तुम्ही पूर्णत: यशस्वी होणार आहात. कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध चांगले होणार आहे. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहात. ज्यामुळे कुटुंबात तुमची एक नवीन ओळख निर्माण करणार आहात.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)