Sahni Guru Horoscope 2024 : शनि आणि गुरू देवाच्या कृपेने 2024 मध्ये अच्छे दिन! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा

Shani Guru Margi : येणारं नवीन वर्ष 2024 हे काही राशींसाठी पैसाच पैसा घेऊन येणार आहे. शनिदेव आणि गुरुदेव या राशींना श्रीमंत करणार आहे. 

नेहा चौधरी | Updated: Nov 18, 2023, 10:43 AM IST
Sahni Guru Horoscope 2024 : शनि आणि गुरू देवाच्या कृपेने 2024 मध्ये अच्छे दिन! 'या' राशींना मिळणार पैसाच पैसा title=
Saturn and Jupiter together These zodiac signs will get money only money shani guru Margi

Guru Shani Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती ही जाचकाच्या आयुष्यावर परिणाम करते. राहू आणि केतूच्या स्थितीनुसार शनि आणि गुरु नवीन वर्ष 2024 अनेक राशींसाठी वरदान ठरणार आहे. नवीन वर्ष सुरु होण्यासाठी काहीच काळ उरला आहे. अशात येणारं नवीन वर्ष हे कोणत्या राशीसाठी घातक तर कोणत्या राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे, हे भाकीत करण्यात येतं आहे. न्यायदेवता शनि सध्या स्वगृही कुंभ राशीत असून तो दिवाळीपूर्वी मार्गी झाला आहे. तर राहू मीन राशीत, केतू कन्या राशीत आहे. तर गुरु मेष राशीत असणार आहे. पण नवीन वर्षात मे महिन्यात तो वृषभ राशीत मार्गी होणार आहे. शनि आणि गुरु मार्गीमुळे काही राशींना जबरदस्त धनलाभ होणार आहे. (Saturn and Jupiter together These zodiac signs will get money only money shani guru Margi)

मेष रास (Aries Zodiac)

गुरु आणि शनि या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ देणार आहे. यश आणि प्रगतीचे शिखरावर ते वरती चढणार आहे. विद्यार्थ्यांना गुरुदेव आणि शनिदेव यश देणार आहे. गुरु मार्गी होताच या राशींना धनलाभ होणार आहे. भाग्यातील आणि दशम स्थानातील रवी तुम्हाला यश, प्रगती आणि सन्मान देणार आहे. नवीन प्रकल्पाचा शुभारंभ तुम्हाला भाग्यशाली ठरणार आहे. मात्र वरिष्ठ लोकांशी वाद टाळा. 

कर्क रास (Cancer Zodiac)

षष्ठ आणि सप्तमातून असलेले गुरु शनीचे भ्रमण हे या राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर होणार आहे. गुरुदेव आणि शनिदेवाच्या कृपेने तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान लाभणार आहे. आवडत्या छंदात तुमचं मन रमणार आहे. कामाच्या तणावातून ब्रेक घेण्यासाठी आवडीत गोष्टी करण्यात तुमचा कल असणार आहे. 

वृश्चिक रास (Scorpio  Zodiac)

या लोकांना गुरुदेव आणि शनिदेवाच्या कृपेने मालमत्तासंबंधित आनंदाची बातमी मिळणार आहे. कामानिमित्त किंवा अन्य कुठल्या कारणानिमित्त तुमला प्रवास घडणार आहे. विद्यार्थ्यांसाठी यशाचे मार्ग खुले होणार आहेत. जोडीदारासोबत आनंदी क्षण व्यतित करणार आहे. कौटुंबिक परिस्थितीतून सुखद अनुभव येणार आहे. नोकरी व्यवसायिकांना आर्थिक लाभ होणार आहे.

कुंभ रास (Aquarius  Zodiac)

शनिदेव आणि गुरुच्या कृपेने तुम्हाला त्रिगुणी योगाचा फायदा होणार आहे. हातात घेतलेल्या कामांना यश मिळणार आहे. तुमची जिद्द आणि कामाप्रती मेहनत तुम्हाला यशाचे शिखर गाठण्यास मदत करणार आहे. कामाच्या ठिकाणी आपली मतं मांडण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. नातेसंबंधात आनंदी वातावरण असणार आहे. जोडीदाराच्या मदतीने आर्थिक फायदा होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Budh Uday 2023 : ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला श्रीमंत! कार्तिक पौर्णिमा ठरणार 'या' राशींसाठी शुभ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)