Vijaya Ekadashi 2023 : फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी म्हणतात. यंदा विजया एकादशी गुरूवार म्हणजे उद्या 16 फेब्रुवारी 2023 ला आहे. असं म्हणतात की विजया एकादशीचा दिवस हे कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी खूप शुभ आहे. या दिवशी सुरू केलेलं कोणत्याही कामात यश मिळतं. त्या कामासाठी विष्णूदेवाचा आशिर्वाद राहतो. याशिवाय विजया एकादशीचे व्रत पाळल्याने साधकाला शत्रूवर विजय मिळवण्याचे वरदान मिळते, अशी मान्यता आहे. यावर्षी विजया एकादशीला तीन अतिशय शुभ योग तयार होत आहेत. (vijaya ekadashi 2023 date significance shubh muhurt pujan vidhi Avoid these things while giving charity remedy and upay for money in marathi)


विजया एकादशी 2023 मुहूर्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील विजया एकादशी 16 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 05.32 पासून असेल. दुसऱ्या दिवशी 17 फेब्रुवारी 2023 रोजी पहाटे 02:49 पर्यंत असेल.


विजया एकादशीचा शुभ मुहूर्त


अभिजीत मुहूर्त - दुपारी 12.13 ते 12.58 वाजेपर्यंत
विजय मुहूर्त - दुपारी 02.27 ते 03.12 वाजेपर्यंत
गोधूलि मुहर्त - सायंकाळी 06.09 ते 06.35 मिनिटांपर्यंत   


पूजा मुहूर्त - सकाळी 07.03 - 08.26


व्रताचं महत्त्वं 


वर्षभरात येणार्‍या प्रत्येक एकादशी व्रताने व्यक्तीला वेगवेगळे पुण्य प्राप्त होते. विजया एकादशीच्या व्रतामुळे साधकाला शत्रूंवर विजय मिळण्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. पौराणिक मान्यतेनुसार, भगवान रामाने रावणाचा पराभव करण्यासाठी आणि युद्ध जिंकण्यासाठी विजया एकादशीचे व्रत देखील केले होते. असं म्हटलं जातं की जो व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूची पूजा करतो आणि खऱ्या मनाने व्रत ठेवतो त्याची सर्व कामे पूर्ण होतात. यासोबतच तो आपल्या शत्रूंवरही विजय मिळवू शकतो.


विजया एकादशी व्रत कसे पाळावे


विजया एकादशीचे व्रत दशमी तिथीपासून सुरू होते. एकादशीच्या एक दिवस आधी फक्त सात्विक आहार घ्यावा. विजया एकादशीला स्नान करून दिवसभर उपवास करावा. दिवसभर श्रीहरीची भक्ती करा. रात्री जागरण करुन विष्णुजींच्या मंत्रांचा जप करा, स्तोत्र करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर उपवास सोडावा. या दिवशी आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवा, राग टाळा आणि जर घरातील कोणी एकादशीचं व्रत केलं असेल तर इतर सदस्यांनीही या दिवशी भाताचे सेवन करू नये. जर भात खाल्लं तर व्रत पूर्ण मानलं जात नाही.


एकादशी व्रताचे नियम


विजया एकादशीच्या दिवशी भात खाऊ नका किंवा शिजवू नका.
या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा केल्यानंतर आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मण आणि गरजूंना दान करा. तरच व्रत पूर्ण मानलं जातं.
विजया एकादशीला पिंपळाच्या झाडाला इजा करू नका. त्यात श्रीहरी वास करतात.


'या' गोष्टी टाळा!


कोणत्याही दबावाखाली दानधर्म करू नका. 
अपात्र व्यक्तीला दान कधीही देऊ नये. 
दानधर्मातील वस्तू या उत्तम दर्जाच्या असाव्यात. 
 कुंडलीत महत्त्वाच्या असलेल्या ग्रहांचे दान कधीही करू नका.
मांस, मद्य इत्यादी वस्तू अजिबात दान करू नका. 


दान करताना नेहमी लक्षात ठेवा की ही वस्तू देवाने दिली आहे आणि मी ही सेवा किंवा दान फक्त देवालाच करत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन दान केल्यास तुम्हाला ऐश्वर्य, समृद्धी लाभते. हे उपाय लहान आहेत, परंतु खूप प्रभावी आहेत. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)