Dev Deepawali 2024 : देव दिवाळी 15 की 16 नोव्हेंबर नेमकं कधी आहे? कार्तिक पौर्णिमेला भद्राची सावली
Dev Diwali 2024 Date : दिवाळी लक्ष्मीपूजनानंतर वेध लागतात ते देव दिवाळी या उत्साहाचा...कधी साजरी करतात देव दिवाळी, काय आहे यामागील कथा जाणून घ्या.
Dev Diwali 2024 Date : दिवाळी मोठ्या थाट्यामाट्यात साजरी करण्यात आल्यानंतर आता वेध लागले आहेत ते देव दिवाळीचे...दिवाळी सणानंतर 15 दिवसांनी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी करण्यात येते. हिंदू पौराणिक कथेनुसार या दिवशी महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होतो. म्हणून, देव दिवाळी हा सण भूतावर भगवान शिवाचा विजय म्हणून साजरा केला जातो. या सोबत हा सण शिवपुत्र भगवान कार्तिकची जयंती देखील आहे. असे मानले जाते हिंदू देवता या दिवशी विजय साजरा करण्यासाठी स्वर्गातून उतरतात.
यंदा कधी आहे देव दिवाळी?
हिंदू पचांगानुसार कार्तिक पौर्णिमा तिथी ही, शुक्रवारी 15 नोव्हेंबरला सकाळी 6.19 मिनिटांपासून 16 नोव्हेंबर मध्यरात्री 2.57 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा असून यादिवशी देव दिवाळी साजरी करण्यात येते.
यावेळी देव दिवाळीवर भद्राची सावली!
कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळीला भद्राचा प्रभाव असणार आहे, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितलंय. ज्योतिषशास्त्रात राहुकाल आणि भद्रा यांना चांगले कार्य करण्यासाठी शुभ मानलं जात नाही. भद्रा सकाळी 6.43 मिनिटांपासून संध्याकाळी 4.37 वाजेपर्यंत असणार आहे. तर राहुकाल सकाळी 10.44 मिनिटांपासून दुपारी 12.05 वाजेपर्यंत असणार आहे.
देव दिवाळी पूजा शुभ मुहूर्त
देव दिवाळीचा प्रदोष काल मुहूर्त 15 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 05.10 मिनिटांपासून ते 07.47 वाजेपर्यंत असणार आहे. पूजेचा एकूण कालावधी 02 तास 37 मिनिटं इतका असणार आहे.
देव दिवाळी पूजन विधी
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. शक्य असल्यास गंगेत स्नान करावे. यानंतर सकाळी तुपाचा किंवा तिळाचा दिवा अर्पण करावा. भगवान विष्णूची पूजा करा. विष्णु चालिसा आणि श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ करा. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी अन्न किंवा अन्नपदार्थ दान करावे.
देव दिवाळीला दीपदानाला महत्त्व!
देव दिवाळीला दीपदानाचे महत्त्व असे आहे की, या दिवशी देव-देवतांची दिवाळी असते असे मानले जाते. देव दिवाळीला दीपदान करण्याची पद्धत आणि महत्त्व आहे. देव दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात पिठाचे 11, 21, 51 आणि 108 दिवे प्रज्वलित करण्यात येते. यानंतर, सर्व देवी-देवतांचे स्मरण करून प्रज्वलित केलेल्या दिव्यावर कुंकू, हळद, अक्षदा आणि फुले अर्पण करावीत. संध्याकाळी नदीत दीपदान करणे पवित्र आणि पुण्य देणारे मानलं जातं.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)