Solar Lunar Eclipse 2023: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येणाऱ्या 2023 या वर्षासाठी नवे संकल्प केले जात आहेत. नवीन वर्षात काय घडामोडी घडतील, याकडेही लक्ष लागून आहे. ज्योतिष, खगोल आणि विज्ञानाच्या दृष्टीकोनातून हे वर्ष खूप महत्त्वाचं असणार आहे. 2022 या वर्षाप्रमाणेच 2023 मध्ये 4 ग्रहण असणार आहेत. यात दोन चंद्रग्रहण (Lunar Eclipse) आणि दोन सूर्यग्रहण (Solar Eclipse) असणार आहेत. ज्योतिष आणि खगोलीय दृष्टीकोनातून या दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. कोणतं ग्रहण भारतातून दिसणार आणि सूतककाल मान्य आहे का? याबाबत उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात 2023 मध्ये ग्रहण कधी लागणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2023 या वर्षातील पहिलं ग्रहण- पंचांगानुसार 2023 मध्ये पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. हे ग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी असणार आहे. या दिवशी गुरुवार असून सकाळी 7 वाजून 4 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत ग्रहण कालावधी असणार आहे. मात्र हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतककाल पाळण्याची आवश्यकता नाही. हे सूर्यग्रहण मेष राशीत असणार आहे. 


2023 या वर्षातील दुसरं ग्रहण- 5 मे 2023 या दिवशी दुसरं ग्रहण असणार आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण असणार आहे. हे ग्रहण सुद्धा भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतककाल पाळण्याची आवश्यकता नाही. हे चंद्रग्रहण तूळ राशीत होणार आहे.


2023 या वर्षातील तिसरं ग्रहण- 14 ऑक्टोबर 2023 रोजी या वर्षातील तिसरं सूर्यग्रहण असणार आहे. हे या वर्षातील दुसरं सूर्यग्रहण असणार आहे. हे ग्रहण सुद्धा भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतककाल पाळवा लागणार नाही. या दिवशी सर्वपित्री दर्श अमावास्या असून हे ग्रहण कन्या राशीत होणार आहे. 


Astrology: पतीला आपल्या तालावर नाचवतात या राशीच्या पत्नी, कसा असतो स्वभाव जाणून घ्या


2023 या वर्षातील चौथं ग्रहण- वर्षातील शेवटचं आणि चौथं चंद्रग्रहण 29 ऑक्टोबर 2023 रोजी असणार आहे. भारतातून दिसणार आहे. त्यामुळे सूतककाल मान्य असणार आहे. चंद्रग्रहण रात्री 1 वाजून 6 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 वाजून 22 मिनिटांनी संपेल. हे चंद्रग्रहण मेष राशीत होणार आहे. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)