पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तीन बोटांचा ठसा का काढतात? तुम्ही तर करत नाही ना `ही` चूक?
Astro Tips : घरात जेव्हा चपाती असो किंवा रोटीसाठी पीठ मळून झाल्यानंतर त्यावर तीन बोटांचा ठसा तुम्ही पाहिला असेल. पण कधी हा विचार केला आहे की, त्यामागे नेमकं कारण काय आहे?
Dough Vastu Tips in Marathi :आज घरात नवरा बायको एकमेकांना घरकामात मदत करतात. दोघेही संसाराचा गाडा एकत्र पुढे नेतात. घरातील कामाचा एक भाग असतो तो म्हणजे स्वयंपाक करणे. स्वयंपाक म्हटलं तर वरण भात, भाजीसोबत गरमा गरम चपाती किंवा रोटी केली जाते. चपाती किंवा रोटी करायची म्हटलं तर आधी पीठ मळलं जातं. पीठ मळून झाल्यानंतर खास करुन महिला त्यावर तीन बोटांचा ठसा काढतात. अगदी घरातील पुरुषाने कधी पीठ मळून दिल्यानंतरही त्या त्यांना आवर्जून त्यावर बोटांचे ठसे देण्यास सांगतात. तुम्ही ही गोष्ट अनेक वेळा पाहिली असेल. पण त्यामागील कारणाबद्दल कधी विचार केला का? प्रत्येक गोष्टीमागे कारण असतं. मग ते शास्त्रीय असो किंवा धार्मिक असो. पीठ मळून झाल्यानंतर बोटाच्या खुणा का दिल्या जातात या मागे काय कारण आहे याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. (Why three finger prints are made on the dough after it is kneading Dough Vastu Tips in Marathi)
पूर्वजांशी आहे त्याचा संबंध!
पिठावर बोटांचे ठसं देण्यामागे धार्मिक कारण असून त्याचा संबंध हा पिंडदानाशी जोडला गेला आहे. हिंदू धर्मात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान करण्याचा विधी केला जातो. पिंडदान केल्याने पितरांना स्वर्गप्राप्ती मिळते, धर्मशास्त्रात मान्यता आहे. पिठ किंवा तांदळापासून बनवलेले पिंडाचा संबंध हा चंद्रांशी आहे, धर्मशास्त्रात सांगण्यात आले आहे. अशीही मान्यता आहे की, चंद्राद्वारे पिंड हे पितरांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे पिंडदानाच्या विधी वेळी खासकरुन तांदळ पिठापासून किंवा भातापासून पिंड तयार केले जातात.
...म्हणूनच आपण बोटांचे ठसे देतो
धार्मिकशास्त्रात पिठाचे गोळे हे पूर्वजांचं अन्न मानलं जातं. त्यामुळे जेव्हा आपण घरात चपाती किंवा रोटी खातो तेव्हा आपल्याला पाप लागतं अशी समज आहे. हे पाप टाळण्यासाठी पीठ मळून झाल्यानंतर त्यावर बोटांचे ठसे दिले जाते. यानंतर या पिठापासून तयार केलेली चपाती किंवा रोटी खाण्यायोग असते असं म्हणतात. म्हणून घरोघरी जेव्हा पीठापासून खास करुन तांदळाच्या पिठापासून जितके पदार्थ असतात त्यांचं पीठ मळताना त्यावर बोटाचे ठसे दिले जातात. म्हणजे ते पिंडदानाचे पीठ वाटणार नाही आणि तुम्हाला पाप लागणार नाही.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)