Afghanistan Vs New Zealand: अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात भारताच्या ग्रेटर नोएडा येथील स्टेडियमवर टेस्ट सामना पार पडणार होता. मात्र हा सामना पाऊस आणि ओल्या आउटफील्डच्या कारणाने एकही बॉल न खेळवता रद्द करण्याची नामुष्की ओढवली. 91 वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय भूमीवर एकही बॉल टाकल्याशिवाय टेस्ट सामना रद्द करण्यात आला. यामुळे भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एक टेस्ट सामना ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय सिंह पथिक स्टेडियमवर आयोजित केला होता. मात्र पाऊस आणि स्टेडियमवरील खराब व्यवस्था इत्यादींमुळे सामना एकही बॉल न खेळवता रद्द करण्यात आला. भारताने पहिल्यांदा 1933 मध्ये टेस्ट सामन्याचे आयोजन केले होते , 1933 नंतर भारताच्या धर्तीवर खेळवण्यात आलेला अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड हा पहिला सामना होता जो एकही सामना खेळवल्या शिवाय रद्द करण्यात आला. यापूर्वी आशियामध्ये असे 1998 मध्ये घडले होते जेव्हा फैसलाबाद येथे पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील टेस्ट सामन्यात असा प्रकार घडला होता.  जगभरात आतापर्यंत केवळ सात टेस्ट सामने असे होते जे एकही बॉल टाकल्याशिवाय रद्द करण्यात आले.  


अफगाणिस्तान क्रिकेटने व्यक्त केली नाराजी : 


न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान सामन्यासाठी बीसीसीआयने यजमानपद भूषवण्याची तयारी दाखवल्यानंतर बीसीसीआयचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं. मात्र आता हवामान आणि मैदानाच्या बिकट अवस्थेमुळे टॉस रद्द झाल्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेटने भारतीय व्यवस्थापनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेटने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटले की, 'ग्रेटर नोएडामध्ये आताही पाऊस  पडत आहे आणि सलग पाचव्या दिवशीही पाऊस पडल्याने खेळ अधिकाऱ्यांनी हा सामना रद्द केला. शहरात मागील आठवड्यात सुद्धा पाऊस पडला होता ज्यामुळे पहिल्या दोन दिवशी मैदानावर खराब पाणी जमा झाले होते. खेळपट्टी सुद्धा ओलसर असल्याने सामना बाधित झाला होता. शेवटचे तीन दिवसही पावसाने व्यत्यय आणला परिणामी सामना एकही बॉल न टाकला रद्द करण्यात आलेला आहे'. खराब व्यवस्था आणि अनुभव नसलेल्या कर्मचाऱ्यांमुळे दोन्ही संघाचे खेळाडू नाखुष दिसले. अफगाणिस्तानच्या एका अधिकाऱ्याने तर 'मोठी गडबड आहे, आम्ही परत इथे कधी येणार नाही' असंही म्हटलं.


हेही वाचा : नोएडा स्टेडिअमधल्या कृतीने बीसीसीआयची नाचक्की, वॉशरुमच्या पाण्याने बनवलं खेळाडूंसाठी जेवण?


 


एकही बॉल न खेळवता रद्द झालेले टेस्ट सामने : 


1. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मॅनचेस्टर, 1890


2. इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मॅनचेस्टर, 1938


3. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, 1970


4. न्यूझीलंड विरुद्ध  पाकिस्तान, डुनेडिन, 1989


5. वेस्टइंडीज विरुद्ध इंग्लंड, गयाना, 1990


6. पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे, फैसलाबाद, 1998


7. न्यूझीलंड विरुद्ध भारत, डुनेडिन, 1998