लखनऊ टीमच्या कर्णधारापदासाठी 3 दिग्गजांची नावं शर्यतीत; बघा तुमचा अंदाज बरोबर का?
चला जाणून घेऊया कोणते 3 खेळाडू आहेत ज्यांना लखनऊ संघाचा कर्णधार बनवता येईल.
मुंबई : आयपीएल 2022 मेगा लिलावापूर्वी 2 नवीन संघांची घोषणा करण्यात आली आहे. अहमदाबाद आणि लखनऊ आता या स्पर्धेतील 9व्या आणि 10व्या फ्रँचायझी बनल्या आहेत. संघाच्या मालकांवर आता सहभागी खेळाडूंना विकत घेण्याची आणि कर्णधाराची निवड करण्याची मोठी जबाबदारी आहे. आणि नक्कीच हे काम काही सोप नाही.
या कंपनींच्या नव्या टीम
आरपी-एसजी ग्रुपने लखनऊ फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांना विकत घेतली आहे आणि सीव्हीसी कॅपिटलने अहमदाबाद संघाची मालकी 5166 कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
हे 3 खेळाडू लखनऊचे कर्णधार बनू शकतात
RP-SG ग्रुपने नवीन IPL संघांसाठी सर्वात मोठी बोली लावली आणि त्यांना लखनऊची फ्रँचायझी मिळाली. या संघाचे होम ग्राउंड भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकना क्रिकेट स्टेडियम असेल. चला जाणून घेऊया कोणते 3 खेळाडू आहेत ज्यांना लखनऊ संघाचा कर्णधार बनवता येईल.
1. स्टीव स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ सध्या दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहे, परंतु या संघात असताना त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिक स्थान मिळू शकतं. लखनऊची फ्रँचायझी केवळ त्याला खरेदी करू शकत नाही, तर कर्णधारपदही सोपवू शकतं. त्याने यापूर्वी राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंटचं नेतृत्व केलं आहे.
2. श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर पुढील वर्षी दुसऱ्या संघाकडून खेळताना दिसण्याची शक्यता आहे. कारण दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी ऋषभ पंतला कर्णधारपदी कायम ठेवण्याच्या मूडमध्ये आहे. अशा परिस्थितीत अय्यर जर लिलावाच्या पूलमध्ये आला, तर लखनऊचा संघ त्याच्यावर त्याच्यावर बोली लावू शकतो. अय्यरने 2020 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच आयपीएलच्या अंतिम फेरीत संघाचे नेतृत्व केलं. जर लखनऊचे मालक दीर्घकालीन भारतीय कर्णधार शोधत असतील तर 26 वर्षीय अय्यर योग्य पर्याय ठरू शकेल.
3. डेविड वॉर्नर
सनरायझर्स हैदराबादमधून डेव्हिड वॉर्नरचे जाणं निश्चित असून तो लिलावात उतरणार असल्याचं आधीच सांगण्यात आलं आहे. अशा स्थितीत लखनऊ संघ त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्याचा विचार करू शकतो. वॉर्नरने आतापर्यंत आयपीएलमध्ये 41.59 च्या सरासरीने आणि सुमारे 140 च्या स्ट्राइक रेटने 5449 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 4 शतकं आणि 50 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल 2021 मध्ये एसआरएच संघाची कामगिरी अत्यंत खराब होती, त्यामुळे वॉर्नरला त्याचा फटका सहन करावा लागला. प्रथम त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आणि नंतर त्याला सतत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलं.