Sanju Samson Father : भारतीय क्रिकेट टीमचा सलामी फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या 4 सामन्यांच्या सीरिजमध्ये दोनदा शतक ठोकून दमदार कामगिरी केली. यापूर्वी त्याने बांगलादेश विरुद्ध सुद्धा टी20 सामन्यात शतक ठोकलं होतं. एका वर्षात टी 20 मध्ये तीन शतक ठोकणारा संजू हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. काही दिवसांपूर्वी संजू सॅमसनचे वडील विश्वनाथ यांनी महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड़वर संजूच्या करिअरची 10 वर्ष उद्ध्वस्त केली. विश्वनाथ सॅमसन यांच्या आरोपांवर आता आकाश चोपडा (Aakash Chopra) याने त्यांना थेट उत्तर दिलं आहे. 


आकाश चोपडाने काय म्हटले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा याने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, "संजू सॅमसनचे वडील काही बोलले आहेत. हे खर्च खूप मजेशीर आहे, कारण त्यांनी  कोहली, रोहित जी, द्रविड़ जी आणि धोनी जी या सगळ्यांच्या नावासमोर जी लावले आणि म्हंटले की त्यांनी माझ्या मुलाच्या करिअरचे 10 वर्ष खराब केले. मला आश्चर्य वाटतंय की हे खर्च आता आवश्यक होतं का". 


आकाशने पुढे म्हटले की, "प्रामाणिकपणे सांगायचे तर, मी सुद्धा एक वडील आहे आणि म्हणून मी असे म्हणू शकतो की वडील पक्षपाती असतात. आपण आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करतो. आपल्याला त्यांच्यात कोणताही दोष दिसत नाही. माझ्या वडिलांच्या बाबतीतही असेच आहे, जेव्हा ते मला पाहतात तेव्हा त्यांना वाटते की आकाशसोबत काहीतरी चुकीचे झाले आहे आणि त्याला संधी मिळायला हवी होती. पण वडील जे म्हणतात त्याच्याशी मुलं सहमत असतातच असं नाही. आपण युवराज सिंह आणि योगराज सिंह यांच्या बाबतीत सुद्धा पाहिलं असेल. जेव्हा वडील कोणतं स्टेटमेंट देतात तेव्हा मुलं स्वतःला त्यापासून वेगळं ठेवतात. मला माहित नाही ते असे का करतात. मला असं वाटतं की याबाबत त्यांच्याशीच बोलायला हवे. वडिलांनी असं काही केल्यावर याचा मुलांना फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान होऊ शकते. जी गोष्ट झाली ती झाली आता त्याला पुढं का बाहेर काढताय. जर तुम्ही कब्र खोडाल तर त्यातून तुम्हाला त्यातून फक्त सांगाडे सापडतील. तुम्ही त्या सांगाड्यांचं काय कराल. आता महत्त्वाचं आहे की तुमच मुलगा चांगला करतोय. जेव्हा तो चांगली कामगिरी करत असेल तेव्हा त्याला खेळू द्या".


हेही वाचा : विजयाच्या जल्लोषात विसरला नाही देशभक्ती, सूर्यकुमार यादवच्या 'या' कृतीने जिंकलं चाहत्यांचं मन


 


विश्वनाथ सॅमसन यांनी नेमके काय आरोप केले?


केरळमधील एका मल्याळम प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत विश्वनाथ यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत. विश्वानाथ यांनी धोनी, कोहली, रोहित शर्माबरोबर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नावाचा थेट उल्लेख केला आहे. "अशी 3 ते 4 लोक आहेत ज्यांनी माझ्या मुलाच्या करिअरमधील 10 वर्ष वाया घालवली. यामध्ये धोनी, विराट, रोहित आणि प्रशिक्षक राहुलचा समावेश आहे. या चौघांनी माझ्या मुलाच्या आयुष्यातील 10 वर्ष वायाला घावली. मात्र त्यांनी त्याला जितका त्रास दिला तितका तो अधिक शक्तीशाली होऊन या संकटातून बाहेर पडेल," असं संजूच्या वडिलांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.