दोन्ही बॅट्समन एकाच जागेवर पोहचले, तरीही दोघही नॉटआऊट
डिविलिअर्सचा नकार पाहून अॅंडरसन मागे धावला दोघेही एकाच जागी पोहोचले.
मुंबई : क्रिकेटमध्ये चपळ फिल्डर्सची संख्या वाढल्यापासून बॅट्समन्सना रन्स चोरण कठीण झालयं. कोणता फिल्डर कधी हवेत उडी मारून कॅच पकडेल, रन आऊट करेल सांगता येत नाही. अशावेळी बॅट्समनची छोटी निष्काळजी त्याला आऊट करू शकते. पण अनेकदा असही होत की फिल्डिंग करणारी टीम चांगल्या संधी सहज सोडून देते. असच काहीस २१ एप्रिलच्या मॅचमध्ये एबी डिविलियर्ससोबत बंगळूर आणि राजस्थानच्या मॅचदरम्यान झालं. तिथे एबी आऊट झाला असता तर मॅचचा निकाल कदाचित वेगळा लागला असता.
अस काहीस घडलं
१६ वी ओव्हर सुरू होती. बोल्टच्या बॉलिंगवर डिविलियर्सने पॉईंटच्या दिशेने बॉल टोलावला. दुसरीकडे असलेला अॅंडरसन धावत डिविलिअर्सच्या जवळ पोहोचला. डिविलिअर्सला रन्स धावायचा नव्हता त्याने मान हलवून नकारही दिला होता. पण अॅंडरसनला धावताना पाहून तो देखील धावायला लागला. दरम्यान डिविलिअर्सचा नकार पाहून अॅंडरसन मागे धावला दोघेही एकाच जागी पोहोचले. गौतम गंभीरने केलेला थ्रो देखील तिथेच आला. पण थ्रो इतका वाईट होता की बोल्ट उडी मारूनही तो पकडू शकला नाही. अॅंडरसनने संधी बघितली आणि रन पूर्ण केला.