नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता अफगानिस्तान टीमचा तसा फारसा बोलबाला नाही. पण, असे असले तरी, अफगानिस्ताने श्रीलंकेला चांगलाच धक्का दिला आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर अफगानिस्तान टीमने आयसीसी टी-२० रॅंकींगमध्ये इतिहास रचत चक्क श्रीलंकेला पाठीमागे टाकले आहे.


जिम्बाब्वेकडून अफगानिस्तान १७ धावांनी पराभूत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आंतरराष्ट्रीय पातळीवर छोट्याशा असलेल्या अफगान टीमचे हे मोठे यश मानले जात आहे. अफगानिस्तान टीमने जिम्बाब्वेला पराभूत करून हे यश मिळवले. जिम्बाब्वेला अफगानिस्तानने १७ धावांनी पराभूत केले. त्यामुळे अफगानिस्तानला बेस्ट रॅंकींग मिळाले आहे.


अफगानिस्तानची आतापर्यंतची सर्वात बेस्ट रॅंकींग


आयसीसीने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार अफगानिस्तान आता ८ व्या स्थानावर पोहोचला आहे. अफगानिस्तानला मिळालेली रॅंकींग ही आतापर्यंतची सर्वात बेस्ट रॅंकींग ठरली आहे. अफगानिस्तान टीमचा पहिला टी-२० सामना १ फेब्रुवारी २०१०मध्ये खेळला गेला होता. त्यानंतर आता पर्यंत टीमने सुमारे ६३ टी-२० सामने खेळले आहेत. यात अफगानिस्तानने वेस्टइंडीज, युएई, ओमानसारख्या संघाला पराभूत केले आहे.



दरम्यान,  या कामगिरीनंतर पुढचा विश्वचषक जिंकने हे अफगानिस्तानचे लक्ष्य आहे. विश्वचषक क्वालीफायर मार्च २०१८मध्ये जिम्बाब्वेमध्ये खेळली जाणार आहे.