Kartik Aaryan fat loss : चंदू चॅम्पियन सिनेमासाठी कार्तिक आर्यनने कमी केलं 32 टक्के फॅट, पाहा कसं?

Kartik Aaryan drops fat Weight : अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ गेल्या काही दिवसांपासून (Chandu Champion) चर्चेत आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.

| May 19, 2024, 21:33 PM IST
1/7

चंदू चॅम्पियन

चंदू चॅम्पियन सिनेमाचं पोस्टर रिलीज केल्यानंतर कार्तिक आर्यनचा लूक पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय. कार्तिकने या लूकसाठी भरपूर मेहनत घेतलीये.

2/7

32 टक्के फॅट लूज

तुम्हाला माहिती नसेल तर, चंदू चॅम्पियनमधील लूकसाठी कार्तिकने चक्क 32 टक्के फॅट लूज केलंय. सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी याची माहिती दिलीये.

3/7

चॅम्पियन

या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने शरीरातील चरबी 39% वरून फक्त 7% पर्यंत कमी केली. कार्तिकने हा चॅम्पियन बनण्याचा जो प्रवास मांडला तो काही कमी प्रेरणादायी नाही, असं कबीर खानने म्हटलं आहे.

4/7

खेळाडूची भूमिका

आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा त्याच्या शरिरात 39 टक्के चरबी होती. पण त्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूची भूमिका करायची होती.

5/7

मी करेन सर

मी जेव्हा कार्तिक आर्यनला सांगितल्यावर तो हसला आणि मी करेन सर, असं त्याने आम्हाला सांगितलं अन् करून दाखवलं, असंही कबीरन खानने सांगितलं.

6/7

स्टेरॉईड्स

तो तब्बल दीड वर्षी स्टेरॉईड्स न घेता तो राहिला आणि तो त्याच्या भूमिकेवर ठाम होता, असंही कबीर खान यांनी यावेळी सांगितलं.

7/7

मुरलीकांत पेटकर

दरम्यान, मुरलीकांत पेटकर हे भारताचा पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते आहे. त्यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे.