घटस्फोटानंतर Shikhar Dhawanची पहिलीच सोशल मीडिया पोस्ट; पाहून बसेल धक्का
असं का म्हणतोय शिखर?
मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याच्या पत्नीनं म्हणजेच आयशा मुखर्जी हिनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आपला घटस्फोट झाल्याचं सांगितलं. जवळपास 8-9 वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आल्याचं सांगत आयशानं सर्वांनाच धक्का दिला. (ex-wife Ayesha Mukherjees divorce post Shikhar Dhawan writes something social media)
आयशानं घटस्फोटाची बातमी दिली पण, अद्यापही शिखरची कोणतीही पोस्ट पाहायला मिळाली नव्हती. अखेर आता शिखरनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली. ज्यामुळं पुन्हा एकदा या सेलिब्रिटी जोडीच्या विभक्त होण्याकडे नजरा वळल्या.
शिखर सध्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघासोबत युएईमध्ये आहे. आयपीएल सुरु होणार असल्यामुळं तो तिथे गेला आहे. पण, खासगी आयुष्यात आलेल्या वादळाचा शिखरवर मात्र काहीच परिणाम झाला नसल्याचं त्याची पोस्ट पाहून कळत आहे. पत्नीनं नातं तुटल्याची पोस्ट शेअर केल्यानंतर शिखरनं मात्र भलतीच पोस्ट शेअर केली.
'कोणतंही लक्ष्य़ गाठण्यासाठी सर्वस्व, समज आणि मन त्यात ओतावं लागतं. आपण जे काम करतोय त्याच्याप्रती प्रेम असल्यावरच त्यात भरभराट येते आणि त्याचा आनंदही घेता येतो. स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खूप मेहनत घेणं सुरुच ठेवा', असं कॅप्शन लिहित शिखरनं स्वत:चाच एक फोटो शेअर केला.
Divorce हा शब्दही घाणेरडा; Shikhar Dhawanचा घटस्फोट; पत्नी आयेशाच्या भावनांचा बांध फुटला
शिखरची ही पोस्ट पाहता खासगी आयुष्यातील वादळाला सामोर गेल्यानंतर आता मात्र तो खेळावरच लक्ष केंद्रीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही शिखर येत्या काळात त्याच्या आणि आयशाच्या नात्याबाबत काय वक्तव्य करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.