मुंबई : बंगळुरू विरुद्ध कोलकाता आज काँटे की टक्कर सामना होत आहे. मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता होत आहे. 7 वाजता टॉस होईल. कोलकाता संघाकडून अजिंक्य रहाणे ओपनिंगला मैदानात उतरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सामन्यात आऊट ऑफ फॉर्म असलेल्या रहाणेनं जलवा दाखवला होता. रहाणेनं 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. त्याने 34 बॉलमध्ये 44 धावा केल्या होत्या. आजच्या सामन्यात पुन्हा रहाणेकडे ओपनिंगसाठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. रहाणेला मैदानात उतरताच 15 धावांची आवश्यकता आहे. 


रहाणेनं 15 धावा केल्या तर त्याच्या नावावर नवा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. त्यासाठी रहाणेला आजच्या सामन्यात 15 धावांची गरज आहे. रहाणेनं जर आज 15 धावा केल्या तर तो IPL मध्ये 4000 धावा करणारा 9 वा भारतीय खेळाडू ठरू शकतो. त्यासोबत हा विक्रम करणारा तो जगातला 12 वा फलंदाज असेल. सर्वात वेगानं हा विक्रम करणारा तो 5 वा फलंदाज असणार आहे. 


आयपीएलमध्ये रहाणेनं आतापर्यंत 152 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 3985 धावा केल्या आहेत. त्याने 2 शतक तर 28 अर्धशतक ठोकले आहेत. रहाणेला आज 15 धावा करून हा विक्रम करण्याची संधी आहे. 


IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली- 6324
रोहित शर्मा- 5652
डेव्हिड वॉर्नर- 5449
डिव्हिलियर्स- 5162
ख्रिस गेल- 4965


कोलकाता संभाव्य प्लेइंग इलेव्हन 


अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, श्रेयस अय्यर (कर्णधार), सॅम बिलिंग्स, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शेल्डन जॅक्सन, टिम साउदी, उमेश यादव आणि वरुण चक्रवर्ती


बंगळुरू संभाव्य प्लेइंग इलेवन


फाफ डुप्लेसीस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक, शेरफाने रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, डेव्हिड विली, वानेंदु हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज आणि सिद्धार्थ कौल