Rohit Sharma ने ब्रेक घेतल्याने माजी क्रिकेटरचा संताप, म्हणाला IPL मधून...
रोहित शर्मावर माजी क्रिकेटरने नाराजी व्यक्त केली आहे. वर्ल्डकप 2023 आधी त्याने विश्रांती घेतल्याने खेळाडूने त्याला सुनावलं आहे.
Sports News : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला न्यूझीलंड दौऱ्याआधी (Ind vs Nz) विश्रांती देण्यात आली आहे. सध्या तो मुंबईत आहे आणि नेटमध्ये सराव करतोय. टी20 वर्ल्डकप 2022 (T20 world cup 2022) मध्ये अपयश आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला विश्रांती दिल्याने काही वरिष्ठ खेळाडूंनी त्याच्यावर टीका केली आहे. माजी क्रिकेटर आकाश चोपडाने म्हटलं की, 'वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) साठी आता खूपच कमी कालावधी राहिला आहे. त्याआधी रोहित शर्माला पुन्हा फॉर्ममध्ये यावं लागेल.' (Akash Chopra Slams Rohit Sharma )
आकाश चोपडाने म्हटलं की, सध्या जगातील सर्वच कर्णधार खेळत आहेत. दासुन शनाका अफगाणिस्तानच्या विरुद्ध नेतृत्व करत आहे. जोस बटलरने वर्ल्ड कपनंतर ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये नेतृत्व केलं. पॅट कमिंसने देखील 3 सामने खेळले. टी20 वर्ल्डकपनंतर सगळे कर्णधार खेळत आहेत. आपल्या रणनितीवर काम करत आहेत. पण आपला कर्णधार कुठे आहे.? वर्ल्ड कपसाठी खूपच कमी वेळ राहिला आहे.'
IPL 2023 मधून ब्रेक घेण्याचा सल्ला
आकाश चोपडाने पुढे म्हटलं की, 'विश्रांती घेतली पाहिजे. कामाचा ताण आहे. पण त्याने वर्ल्डकपचा विचार केला पाहिजे. तो टीम इंडियाचा कर्णधार आहे. त्याला पुन्हा फॉर्ममध्ये यायचं आहे. टीम बांधायची आहे. त्यामुळे त्याने कमी ब्रेक घेतला पाहिजे. त्याला जर विश्रांतीची गरज असेल तर त्याने आयपीएल दरम्यान विश्रांती घ्यावी.'