मुंबई : निदहास चषकाचा अंतिम सामना फारच रोमांचक होता. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटवेडे भारतीय प्रार्थना करत होते. कारण भारताला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती. 


दिनेश कार्तिकची कमाल 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिनेश कार्तिकने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत बांग्लादेशवर 4 गडी राखून मात केली आहे. सोबतच तिरंगी मालिकादेखील खिशात घातली. सोशल मीडियावर दिनेश कार्तिकसोबतच भारतीय  संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र उत्साहात ट्विट करताना बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना दिनेशची माफी वागावी लागली. 


 




 


बीग बींच्या ट्विटमध्ये चूक 


अमिताभ बच्चन यांनी ट्विट करताना '2 षटकात 24 धावांची गरज आहे. असे ट्विट केले होते. पण वास्तवात भारताला 2 षटकामध्ये 34 धावांची गरज होती. 
बीग बींना ही चूक कळताच त्यांनी ट्विटमध्ये बदल केला. सोबतच दिनेशची माफी मागतो असे म्हणत त्यांनी ट्विट पुन्हा केलं