मुंबई : दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने सिरीज हातातून गमावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असताना सर्वच बाजूने टीम इंडियावर जोरदार टिका होत आहे. टीम इंडियाचे माजी धुरंधर खेळाडू आपापल्या परिने या खेळावर आपली मत देत आहेत. आता यामध्ये आणखी एक महत्वाचं वक्तव्य आलं आहे आणि ते म्हणजे महानायक अमिताभ बच्चन यांचे. बिग बी यांनी टीम इंडियाचं समर्थन केलं आहे. अमिताभ बच्चन टीम इंडिया भारतात खेळत असो किंवा परदेशात ते कायमच या संघाचा उत्साह वाढवत असतात. 


आता या मोठ्या पराजयानंतर अमिताभ बच्चन यांनी आपलं मत सांगणार ट्विट केलं आहे. आपल्या ऑफिशिअल अकाऊंटवरून टीम इंडियाचं समर्थन करणार ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमधून टीम इंडियावर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. 



बिग बी यांनी टीम इंडियाचं समर्थन करताना म्हटलंय की, न्यूझीलँडमध्ये अंडर 19 वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंच भरपूर कौतुक केलं आहे. पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी टीम वर्ल्डकपमध्ये शानदार खेळ खेळल्याचं म्हटलं आहे. 


बिग बी यांनी फास्ट बॉलर कमलेश नागरकोटी, मावी टीमच कॅप्टन पृथ्वी शॉचे भरपूर कौतुक केले आहे. हे सर्व खेळाडू टूर्नामेंटमध्ये मस्त प्रदर्शन करत आहेत.