मुंबई : बीसीसीआयनं आयपीएलच्या धर्तीवर आता नव्या लीगची सुरुवात केली आहे. अंडर-२३ साठीची ही वनडे लीग बुधवार १३ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या लीगमध्ये खेळणार आहे. अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा फास्ट बॉलर आहे. सचिनचा मुलगा असल्यामुळे अर्जुन तेंडुलकर नेहमीच चर्चेत असतो. याआधी अर्जुन तेंडुलकर भारताच्या अंडर-१९ टीमकडूनही खेळला आहे. आता जयपूरमध्ये होणाऱ्या वनडे लीगमध्ये अर्जुन तेंडुलकर मुंबईकडून खेळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जय बिश्ट कर्णधार असलेल्या मुंबईच्या १५ सदस्यांच्या टीममध्ये अर्जुन तेंडुलकरची निवड झाली आहे. डी.वाय.पाटील टी-२० कप आणि आरएफएस ताल्यरखान मेमोरियल इनव्हिटेशन टुर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे अर्जुनची मुंबईच्या टीममध्ये निवड झाली आहे. ताल्यरखान मेमोरियलमध्ये १९ वर्षीय ऑलराऊंडर असलेल्या अर्जुननं १८ व्या आणि २०व्या ओव्हरमध्ये फक्त ५ रन दिल्या. आक्रमक बॅटिंग करणाऱ्या यशस्वी जयसवालची विकेटही अर्जुननं घेतली. तसंच २ अभ्यास मॅचमध्ये अर्जुननं चांगली बॉलिंग केली आणि प्रत्येक मॅचमध्ये २-२ विकेटही घेतल्या. 


अर्जुनच्या निवडीवर प्रशिक्षक अमित पागनिस एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले, 'यॉर्कर, बाऊन्सर आणि स्लो बॉल अर्जुनची ताकद आहे.' अर्जुननं विजय मर्चंट टीमकडून खेळताना विजय मांजरेकर टीमविरुद्ध महिंद्रा शिल्ड अंडर-१९ स्पर्धेत ७० रन देऊन ६ विकेट घेतल्या. मागच्यावर्षी इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय टीमला नेट प्रॅक्टिसमध्ये अर्जुननं बॉलिंगही टाकली. 


मुंबई अंडर-२३ टीम


जय बिश्ट (कर्णधार), हार्दिक तोमरे (विकेट कीपर), सुवेद पारकर, चिन्मय सुतार, सिद्धार्थ अक्रे, कर्श कोठारी, तनुष कोटियान, अकीब कुरेशी, अंजदीप लाड, कृतीक हानागवडी, आकाश आनंद, अमन खान, अथर्व अंकोलेकर, अर्जुन तेंडुलकर, सौराज पाटील