क्रिकेट जगतात मोठी खळबळ; एशिया कप दरम्यान जुगार खेळायला गेले पाकिस्तान टीमचे मेंबर
India vs Pakistan Asia Cup 2023: भारत-पाकिस्तान सामन्यात इतक्या सर्व घडामोडी घडत असताना पाकिस्तानाच्या ताफ्यामधून एक लज्जास्पद बातमी समोर आली आहे. सर्वांना उत्सुकता असलेल्या भारत पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याच्या मध्येच पाक टीमकडून एक मोठी बातमी समोर आली आहे.
India vs Pakistan Asia Cup 2023: 10 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील सामना सुरु झाला खरा, मात्र पावसाच्या व्यत्ययाने सामना रिझर्व्ह डे च्या दिवशी पूर्ण करण्यात येणार आहे. सतत येणाऱ्या पावसामुळे 10 सप्टेंबरच्या दिवशी हा सामना थांबवण्यात आला. त्यानंतर सोमवारी म्हणजेच 'रिझर्व्ह डे'ला जिथे सामना थांबवण्यात आला तिथूनच सुरु करण्यात येईल. भारत-पाकिस्तान सामन्यात इतक्या सर्व घडामोडी घडत असताना पाकिस्तानाच्या ताफ्यामधून एक लज्जास्पद बातमी समोर आली आहे.
जुगार खेळायला पोहोचले पाकिस्तानचे 2 मेंबर
सर्वांना उत्सुकता असलेल्या भारत पाकिस्तान ( India vs Pakistan ) सामन्याच्या मध्येच पाक टीमकडून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेट टीमचे ( Pakistan Cricket Team ) मीडिया मॅनेजर उमर फारुख कलसन आणि बोर्डाचे सरव्यवस्थापक अदनान अली हे दोघं कोलंबोतील कॅसिनोला भेट दिल्यानंतर वादात सापडलेत. हे दोन्ही सदस्य आशिया कपमध्ये ( Asia cup ) पाकिस्तानी टीमसोबत आहेत. दरम्यान ही गोष्ट आयसीसीच्या ( ICC ) भ्रष्टाचार विरोधी युनिटच्या लक्षात आली असल्याचं म्हटलं जातंय.
सोशल मीडियावर झाला एकच गोंधळ
दरम्यान ही गोष्ट प्रकाश झोतात येतात सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. अनेक क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केला की, पीसीबीचे दोन्ही अधिकारी इतके निष्काळजी कसे असू शकतात. त्यामुळे आता या दोघांवर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
कशी आहे सध्या सामन्याची परिस्थिती?
या सामन्यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियाने पूर्णपणे आपल्या बाजून वळवला. ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी तुफान फलंदाजी करत अर्धशतकं पूर्ण केली. यानंतर दोघांनीही आपली विकेट गमावली. सध्या क्रिझवर के.एल राहुल आणि विराट कोहली असून 'रिझर्व्ह डे'च्या सुरुवातीला हे दोघं फलंदाजीला उतरणार आहेत.