Athiya Shetty On KL Rahul Video: टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज आणि लखनऊ सुपर जायन्ट्सचा कर्णधार केएल राहुल (KL Rahul) दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) मधून बाहेर पडला होता. दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.  केएल राहुल सध्या लंडनमध्ये आहे. अशातच एका खास कारणामुळे चर्चेत आलाय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल (Viral Video) होत होता. या व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती केएल राहुल असल्याचं दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेला व्हिडिओ लंडनमधील एका स्ट्रिप क्लबचा (strip club) आहे, जिथं तो एन्जॉय करताना दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना केएल राहुलला टार्गेट करण्याची संधी मिळाली. या प्रकरणावर केएल राहुलने गप्प राहणं पसंत केलं. मात्र, राहुलची पत्नी आथिया शेट्टी (Athiya Shetty) हिचा पारा मात्र चांगलाच चढला. सोशल मीडियावर पोस्ट करत आथियाने (Athiya Shetty Post) आपला राग व्यक्त केला आहे.


पाहा Video



काय म्हणाली Athiya Shetty?


मी सहसा शांत राहणे आणि प्रतिक्रिया न देणे निवडतो, परंतु कधीकधी स्वतःसाठी उभे राहणे महत्वाचे असते, असं आथिया म्हणते. राहुल, मी आणि आमचे मित्र नेहमीप्रमाणे आमच्या रेग्युलर ठिकाणी जाणं पसंत करतो. अशा गोष्टींची चर्चा करणं थांबवा. कोणतीही गोष्ट बोलण्याआधी तथ्य तपासा, असंही म्हणत तिने ट्रोलर्सला खडेबोल (Athiya Shetty On Trollers) सुनावले आहेत.


पाहा Post 



दरम्यान, 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध झालेल्या सामन्यात फिल्डिंग करताना त्याला राहुलला दुखापत (KL Rahul Injury) झाली होती. राहुल फीट होणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. केएल राहुल पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून (IPL 2023 Final) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी इशान किशनला संधी मिळालीये. अशातच आता बाहेर फिरताना नेटकऱ्यांचा पारा चढला आहे. मात्र, सर्वांना खासगी आयुष्याचा विचार करणं देखील तितकंच गरजेचं आहे.