IND VS AUS 2nd Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील (Border Gavaskar Trophy) दुसरा सामना हा शुक्रवारपासून एडिलेड येथे खेळवला जात आहे. एडिलेड येथील सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम (Australia Cricket Team) डाव्या हातावर काळी फित बांधून मैदानात उतरली. सीरिजच्या पहिल्याच सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया क्रिकेटने आयसीसीला याबाबत माहिती दिली होती. 2020 नंतर टीम इंडिया प्रथमच टेस्ट सामना पिंक बॉलने खेळणार आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) हा टॉस जिंकला आणि प्लेईंग 11 मध्ये 3  मोठे बदल केले. 


रोहितने प्लेईंग 11 मध्ये केले मोठे बदल : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध ऑस्टेलिया यांच्यात पर्थ येथे झालेला पहिला टेस्ट सामना हा टीम इंडियाने जवळपास 290 धावांनी जिंकला. त्यामुळे भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. एडिलेड येथे 6 डिसेंबर पासून दुसरा टेस्ट सामना सुरु झाला. यात कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करत असून त्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी प्लेईंग 11 मध्ये आर अश्विन, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची एंट्री झाली तर देवदत्त पड्डीकल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर या तिघांना बेंचवर बसवण्यात आले. 


ऑस्ट्रेलिया संघाने का बांधली काळी फित? 


एडिलेड येथे सामन्याला सुरुवात झाल्यावर ऑस्ट्रेलियन संघ हा डाव्या हाताच्या दंडावर काळी फित  बांधून मैदानात आला. 10 वर्षांपूर्वी दिवंगत ऑस्ट्रेलियन फलंदाज फिल ह्यूज याचा सामना सुरु असताना डोक्याला बॉल लागल्याने मृत्यू झाला होता. फिल ह्यूज हा ऑस्ट्रेलियाचा युवा ओपनर गोलंदाज होता. 27 नोव्हेंबर 2014 रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ सह खेळाडूला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एडिलेड टेस्ट सामन्या दरम्यान हातावर काळी फित बांधून खेळणार आहेत. तसेच सामान्याच्या चौथ्या दिवशी मैदानावर दिवंगत फिल ह्यूजला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिटांचं मौन देखील बाळगलं जाणार आहे. 


हेही वाचा : KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?


 


फिल ह्यूजचं करिअर : 


ऑस्ट्रेलियाचा ओपनर फिल ह्यूज याने ऑस्ट्रेलियाकडून 26 टेस्ट सामने खेळले. या कालावधीत त्याने 1535 धावा केल्या ज्यात 3 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश होता. ह्युजच्या नावावर 25 वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 826 धावा आहेत. ह्यूजने वनडेमध्ये 2 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली होती. ह्युजची टेस्टमधील सर्वोत्तम धावसंख्या 161 धावा होती तर वनडेत त्याने नाबाद 138 धावांची सर्वोत्तम खेळी होती. 24 नोव्हेंबर 2014 रोजी, सिडनी येथे देशांतर्गत सामन्यादरम्यान ह्यूजच्या मानेवर बाऊन्सर टाकलेला बॉल लागला. त्याने हेल्मेट घातले होते पण चेंडू त्याच्या मानेला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. सुमारे 3 दिवस तो सिडनी रुग्णालयात कोमामध्ये गेला होता आणि अखेर 27 नोव्हेंबर 2014 रोजी त्याचे निधन झाले.


भारताची प्लेईंग 11 :


यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज


ऑस्ट्रेलियाची प्लेईंग 11 :


उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड