AUS vs SA: कांगारू काही सुधरेनात.. विजयांनंतर Temba Bavuma ला उंचीवरून डिवचलं!
ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने (Australia cricket website) टेंबा बावुमा (Temba Bavuma) ची खिल्ली उडवली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत असून चाहत्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.
Temba Bavuma : ऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका (Australia vs South Africa) यांच्यामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 182 रन्स आणि एका डावाने पराभव केला. यासोबत 3 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने (Australia cricket website) टेंबा बावुमा (Temba Bavuma) ची खिल्ली उडवली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत असून चाहत्यांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या एखाद्या सिरीजमध्ये वाद झाला नसेल, असं क्वचितच पहायला मिळतं. खेळाडूंचं स्लेजिंग आणि वर्णभेदी टीका या अनेक सिरीजमध्ये पहायला मिळाल्या आहेत. मात्र यावेळी ऑस्ट्रेलिया क्रिकेट वेबसाईटने Temba Bavuma वर ट्विट करत याची कमतरता भरून काढली.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वेबसाईटने सोशल मीडियावर Temba Bavuma आणि मार्को यानसम यांचा एक फोटो पोस्ट करत दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू Temba Bavuma ची उंचीवरून खिल्ली उडवली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवर म्हटलंय की, मार्को यानसन आणि टेंबा बावुमा यांच्या उंचीमध्ये 45 सेमीचा फरक आहे. टेस्ट क्रिकेट हे सर्वांसाठी आहे.
ऑस्ट्रेलियाने इतक्या वाईट पद्धतीने सोशल मीडियावर टेंबा बावुमाची खिल्ली उडवल्यामुळे फॅन्स मात्र नाराज झाले आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या या लज्जास्पद कृत्यासाठी त्यांना चांगलंच ट्रोल केलं आहे.
फॅन्सने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला केलं ट्रोल
ऑस्ट्रेलियाने भलेही दक्षिण आफ्रिकेविरूद्धचा सामना जिंकला असेल, मात्र चाहत्यांना ही पोस्ट काही पटली नाही. यावेळी चाहत्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ट्रोल करत म्हटलंय की, वय, उंची, लिंग तसंच धर्म यांचा विचार न करता कोणतंही क्रिकेट बोर्ड व्यावसायिक क्रिकेटपटूंची खिल्ली उडवू नये. तुम्ही मीम पेज चालवत नाही, तर तुम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व करता हे लक्षात असूद्या.
ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा टीम इंडियाला फायदा
तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 2-0 ने आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 182 धावांनी पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेच्या दारूण झालेल्या पराभवामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचं स्थान जवळपास निश्चित झालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारताचं दुसरं स्थान जैसे थेच आहे. तर ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी कायम आहेत. गुणतालिकेत अग्रस्थानी असलेल्या दोन संघांना अंतिम खेळण्याची संधी मिळते.
ऑस्ट्रेलियाला 12 गुण झाले असून 14 सामन्यात 132 पॉईंट्स झाले आहेत. या विजयासह ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 78.57 टक्के आहे. म्हणजे पुढच्या वर्षी ओव्हल मैदानात होणाऱ्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलिया खेळेल. अजूनही ऑस्ट्रेलियाला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 1 ऑस्ट्रेलिया, तर 4 भारताविरुद्ध खेळायचे आहेत.